मुंबई - Kamal Sadanah and Divya bharti :अभिनेत्री दिव्या भारती आणि अभिनेता कमल सदना स्टारर 'रंग' चित्रपट 90च्या दशकात खूप गाजला होता. दिव्या आज आपल्यात नसली तरी ती तिच्या चाहत्यांच्या मनावर आजही राज्य करते. दरम्यान आता कमलनं दिव्या भारतीच्या मृत्यूचं रहस्य उघड केलं आहे. सिद्धार्थ कन्ननबरोबर दिलेल्या एका मुलाखतीत कमल सदानानं आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यानं दिव्या भारतीचा उल्लेख करताना म्हटलं, "तिच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं, तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान होता. दिव्या अभिनेत्री श्रीदेवीची नक्कल करायची, तिच्या मृत्यूची बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती. या काळात मी तिच्याबरोबर काम करत होतो. मला असं वाटते की, दिव्यानं थोडी दारू पीली होती. ती त्यावेळी मजा- मस्ती करत होती आणि कदाचित ती यावेळीच घसरली असेल. मला वाटते की, हा एक अपघात आहे."
कमल सदाना दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल केला खुलासा :दरम्यान कमल त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही बोलला. त्यानं पुढं सांगितलं की, "माझा 20 वा वाढदिवस होता, माझे वडील ब्रिज यांनी मला, आई आणि बहिणीला गोळ्या झाडल्या आणि नंतर स्वत: ला गोळी मारून घेतली." यामध्ये माझ कुटुंब संपलं. या अपघातात कमलच्या मानेला गोळी लागली आणि तो वाचला. मात्र या घटनेत त्याची आई, वडील आणि बहीणचा मृत्यू झाला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी हा अपघात झाल्यानं, तो आजही आपला वाढदिवस साजरा करत नाही. कमलचा जन्म 21 ऑक्टोबर 1970 रोजी झाला असून आज तो 53 वर्षांचा आहे. ज्या घरात हा भीषण अपघात झाला तो तिथे आजही राहतो.