मुंबई- Kalki 2898 AD Trailer : साऊथ सुपरस्टार प्रभास स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'कल्की 2898 एडी'च्या रिलीजची प्रतीक्षा अनेकजण करत आहे. प्रभाससह बॉलिवूड आणि साऊथमधील अनेक दिग्गज कलाकारांची भूमिका असलेला हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. याआधी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रभासच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर 10 जूनला प्रदर्शित होणार आहे. आता 10 जूनपर्यंत वाट पाहणं प्रभासच्या चाहत्यांसाठी खूप कठीण आहे. 'कल्की 2898 एडी' चा ट्रेलर धमाकेदार असणार असल्याची आशा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवरील व्ह्यूअरशिपचे सर्व चित्रपटांचे रेकॉर्डही मोडू शकते. दरम्यान कोणत्या चित्रपटाच्या ट्रेलरला त्याच्या रिलीजच्या 24 तासांत सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि 'कल्की 2898 एडी' त्यांचा विक्रम मोडू शकेल का? याबद्दल जाणून घेऊया...
- या चित्रपटांना 24 तासात मिळले होते 'इतके' व्ह्यूज
'केजीएफ' 2 - 106 मिलियन व्ह्यूज
'आदिपुरुष'-74 मिलियन व्ह्यूज (प्रभास)
'सालार' - 72.2 मिलियन व्ह्यूज (प्रभास)
'अॅनिमल'- 71.3 मिलियन व्ह्यूज
'राधे श्याम' - 57.5 मिलियन व्ह्यूज (प्रभास)
'जवान' - 55 मिलियन व्ह्यूज
'आरआरआर'- 51 मिलियन व्ह्यूज
'तू झूठी मैं मक्कार'- 51 मिलियन व्ह्यूज
'साहो'- 49 मिलियन व्ह्यूज (प्रभास)
'कल्की 2898 एडी' कधी रिलीज होणार? :प्रभासचा मागील चित्रपट 'सालार पार्ट 1 - सीजफायर'च्या ट्रेलरला रिलीजच्या 24 तासांत 113.2 दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. दरम्यान नाग अश्विनच्या दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट जवळपास 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हासन यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. 'कल्की 2898 एडी' चित्रपट पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करेल, अशी आशा अनेकजण करत आहे. हा चित्रपट 27 जून रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि प्रभास हे वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. हा चित्रपट वैजयंती मूव्हीज आणि सी. आसवानी दत्त अंतर्गत निर्मित केला गेला आहे.
हेही वाचा :
- बॉलिवूड अभिनेत्रींची प्रेग्नेंसीमधील स्टाईल - bollywood celebs
- बॉलिवूड आणि साऊथकडील सेलिब्रिटींनी 2024 च्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केल्या पोस्ट शेअर - World Environment Day 2024
- प्रतीक्षा संपली, प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर होणार 'या' दिवशी रिलीज... - Kalki 2898AD Trailer