मुंबई - Happy Birthday Kajol: गुणी अभिनेत्री काजोल आज 5 ऑगस्ट रोजी 50वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी काजोलचे चाहते आणि सेलिब्रिटी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. काजोल बॉलिवूडमध्ये 3 दशकांपासून काम करत आहे. तिने अभिनय केलेल्या कोर्टरूम ड्रामा वेब सीरीज 'द ट्रायल' (2023) आणि 'लस्ट स्टोरीज 2' (2023) ला नेटिझन्सचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता काजोल 'सरजमीन', 'दो पत्ती' आणि 'महारागिणी- क्वीन ऑफ क्वीन्स'मध्ये दिसणार आहे. काजोलनं शाहरुख खानबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज काजोलच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तिच्या विशेष चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे पाहून तुमचे देखील मनोरंजन होईल.
'बाजीगर' (1993) : काजोलनं 1992 मध्ये 'बेखुदी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर तिनं 1993 मध्ये पहिल्यांदा शाहरुख खानबरोबर 'बाजीगर' चित्रपटात काम केलं. 'बाजीगर' हा शाहरुख आणि काजोलच्या जोडीचा हिट चित्रपट आहे.
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (1995) :1995 मध्ये शाहरुख खान आणि काजोलची जोडी 'करण-अर्जुन' आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'मध्ये दिसली होती. शाहरुख आणि काजोलच्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर टॅग मिळवला होता. 'दिलवाले...'तली तिची सिमरन इतकी लोकप्रिय झाली की आजही सिमरनला केंद्रस्थानी ठेऊन अनेक मिम्स पाहायला मिळतात.
'कुछ-कुछ होता है '(1998) : तीन वर्षांनंतर, 1998 मध्ये, काजोल आणि शाहरुखच्या जोडीनं 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत धमाका केला. करण जोहरनं 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटामध्ये लव्ह ट्रँगल दाखविण्यात आला होता. या चित्रपटासाठी काजोलचं खूप कौतुक झालं.