महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

काजोल आणि जया बच्चन यांचा दुर्गापूजेतील रंजक संवादचा व्हिडिओ व्हायरल - KAJOL AND JAYA VIDEO VIRAL

Kajol and Jaya Bachchan : काजोल आणि जया बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघींही मजेदार बोलताना दिसत आहे.

Kajol and Jaya Bachchan
काजोल आणि जया बच्चन (Kajol and Jaya Bachchan - instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 11, 2024, 11:32 AM IST

Updated : Oct 11, 2024, 1:48 PM IST

मुंबई : देशभरात दुर्गापूजा खूप थाटामाटात साजरी केली जात आहे. आज 11 ऑक्टोंबर रोजी दुर्गापूजेचा 9वा दिवस सुरू झाला असून अनेकजण देवीची पूजा करण्यासाठी पंडालमध्ये पोहोचत आहेत. गरबा आणि दांडियाचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात आले असून या उत्सवाचा आनंद आता भक्त घेत आहेत. दरम्यान बी-टाऊनचे सेलिब्रिटीही दुर्गापूजा मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्टार्स एकत्र येऊन देवीची पूजा करताना दिसत आहेत.आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि जया बच्चन एकत्र असल्याच्या दिसत आहेत.

काजोल आणि जया बच्चन यांचा व्हिडिओ व्हायरल :समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काजोल आणि जया बच्चन यांच्या चेहऱ्याच्या हावभाववरून या दोघेही काहीतरी खास बोलताना दिसत आहेत. व्हिडिओत जया बच्चन सतत हातानं इशारा करत काजोलला काहीतरी सांगत आहेत. यादरम्यान काजोल ही सरप्राईज होण्याचे रिॲक्शन देत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी जया बच्चन आणि काजोल यांना ट्रोलही केलंय. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं, 'जया बच्चन नक्कीच आपल्या सुनेबद्दल चुगली करत असेल.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'देवी माता या दोघींना चांगल बोलायला शिकव.' आणखी दुसऱ्या एकानं लिहिलं, 'कधी सुनेबरोबर देखील चांगली बोलत जा.'

काजोल आणि राणी मुखर्जीचा व्हिडिओ चर्चेत : यापूर्वी काजोल आणि राणी मुखर्जीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, यामध्ये दोघेही एकत्र दिसल्या होत्या. यावेळी दोघींनी पापाराझीला फोटोसाठी एकत्र पोझ दिली होती. त्यांचा हा व्हिडिओ यूजर्सला खूप आवडला होता. बी-टाऊनमध्ये दरवर्षी पंडाल लावला जातो. या पंडालमध्ये काजोल, राणी मुखर्जी, जया बच्चन, रुपाली गांगुली, तनिषा मुखर्जी, सिमोना चक्रवर्ती, अयान मुखर्जी असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित असतात. आता सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात सेलिब्रिटी या पूजेचा आनंद घेताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. काजोलनं 21 वर्षात शाहरुख खानबरोबर केलेले 6 हिट चित्रपट, नक्की पाहा - 6 superhit movies
  2. 'महारागणी : क्वीन ऑफ क्वीन्स'मध्ये काजोल दिसणार ॲक्शन अवतारात - maharangini queen of queens movie
  3. राज्यसभेच्या सभापतींवर संतापल्या जया बच्चन, म्हणाल्या, "तुमचा टोन मान्य नाही..." - JAYA BACHCHAN ON JAGDEEP DHANKAR
Last Updated : Oct 11, 2024, 1:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details