महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ज्येष्ठ नागरिकांना युजलेस समजणाऱ्यांना चपराक देण्यासाठी महेश मांजरेकर आणताहेत 'जुनं फर्निचर' - Mahesh Manjrekars Juna Furniture - MAHESH MANJREKARS JUNA FURNITURE

Mahesh Manjrekars Juna Furniture : ज्येष्ठ नागरिकांना अनेक कुटुंबात अपमानजनक वागणूक मिळत असते. कुटुंबासाठी आयुष्यभर खस्ता खालेल्या ज्येष्ठाला त्याच्या अखेरच्या दिवसात सन्मान मिळावा यासाठी संघर्ष करणाऱ्या म्हाताऱ्याची गोष्ट महेश मांजरेकर घेऊन आले आहेत. 'जुनं फर्निचर' असे शीर्षक असलेला हा चित्रपट २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Juna Furniture
'जुनं फर्निचर'

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 2:58 PM IST

मुंबई - Mahesh Manjrekars Juna Furniture : महेश मांजरेकरांचा नवा कोरा चित्रपट 'जुनं फर्निचर' हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा दिमाखात पार पडला होता. टीझरमधील महेश मांजरेकर यांनी साकारलेल्या करारी व्यक्तिमत्वाची झलक सर्वांनाच चकित करुन गेली होती. या चित्रपटातील इतर कलाकार कोण आहेत यावरील पडदा आता बाजूला करण्यात आलाय.

'जुनं फर्निचर' पोस्टर

नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले असून यामध्ये महेश मांजरेकर यांच्याबरोबर मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर भूमिका साकारताना दिसत आहेत. पोस्टरमध्ये न्यायालय, न्यायधीश आणि काही कागदपत्रांची झलक दिसत आहेत. पोस्टरमध्ये न्याय, हक्क, कायदा या शब्दांचा विशेष उल्लेख दिसत आहे. त्यामुळे आता ही कोणती लढाई लढली जाणार आहे, याचे उत्तर आता प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतरच कळणार आहे.

'जुनं फर्निचर' या चित्रपटात समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. यांच्या शिवाय या चित्रपटात ओंकार भोजने, शिवाजी साटम यांचीही झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक बड्या कलाकारांची मांदियाळी एकत्र पाहाण्याची संधी मिळणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अर्थातच महेश वामन मांजरेकर यांनी केले असून यतिन जाधव 'जुनं फर्निचर' चित्रपटाचे निर्माते आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी म्हटलंय की, ''जुन्या फर्निचरमध्ये किती शक्ती आणि मजबूती असते, हे दाखवण्याचा प्रयत्न या 'जुनं फर्निचर' चित्रपटातून करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाचा लढा यात पाहता येणार आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी अशा प्रकारच्या संघर्षाला सामोरे गेले असतील, परंतु ही प्रकरणे पडद्या आडच राहतात. मी तर म्हणेन की, हा चित्रपट प्रत्येक तरूणाने आपल्या पालकांसोबत पाहायला हवा ज्यामुळे त्यांचा जुन्या व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.''

महेश मांजरेकरांबद्दल बोलायचं झालं तर आजवर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी अनेक चित्रपटाचं दिग्दर्शनही केलंय. आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांचा 'जुनं फर्निचर' हा चित्रपट प्रतीक्षेत असणार आहे. हा चित्रपट 26 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. या चित्रपटाचा टीझर दादर-शिवाजी पार्क येथे सलीम खान यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला होता. यावेळी महेश मांजरेकर यांच्या शिवाय अनुषा दांडेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर हे कलाकार उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. अल्लू अर्जुनच्या दुबईत मेणाच्या पुतळ्याचे लोकर्पण, पुष्पा स्टाईलनं चाहत्यांना केलं चकित - Allu Arjun wax statue
  2. अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थनं केला साखरपुडा; फोटो व्हायरल - Aditi and siddharth engagement
  3. महेश मांजरेकर सध्याच्या परिस्थितीवर राजकीय चित्रपट निर्मिती करणार - Mahesh Manjrekar

ABOUT THE AUTHOR

...view details