मुंबई - Ulajh Trailer Out Now : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या थ्रिलर चित्रपट 'उलझ'च्या रिलीजसाठी खूप उत्सुक आहे. या चित्रपटात ती गुलशन देवैया आणि रोशन मॅथ्यूबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट 2 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. रिलीजपूर्वी, जंगली पिक्चर्सनं चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. हा ट्रेलर खूप जोरदार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधांशू सारिया दिग्दर्शित, 'उलझ'ची कहाणी जान्हवी कपूरच्या दमदार व्यक्तिरेखेभोवती फिरणार आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर हा जान्हवीनं आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
जान्हवी कपूर स्टारर 'उलझ'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - ULAJH TRAILER - ULAJH TRAILER
Ulajh Trailer Out Now: जान्हवी कपूर तिचा आगामी चित्रपट 'उलझ'च्या रिलीजसाठी सज्ज आहे. आज निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.
Published : Jul 16, 2024, 3:29 PM IST
'उलझ'चा ट्रेलर रिलीज : जान्हवी कपूरनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "प्रत्येकाची एक गोष्ट असते. प्रत्येक कहाणीचं रहस्ये असतात. प्रत्येक रहस्यचा एक सापळा. ही समस्या सोडवणे सोपे जाणार नाही. 'उलझ'चा ट्रेलर हा नुकताच रिलीज झाला आहे. 2 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये येईल." या चित्रपटाचा ट्रेलर हा अनेकांना आवडला आहे. यामध्ये जान्हवीनं केलेला अभिनय यूजर्सला पसंत पडत आहे. अनेकजण तिच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहेत. 'उलझ' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जान्हवी एका आरोपांमध्ये अडकली आहे. या चित्रपटात ती सुहाना भाटियाची भूमिका साकारली असून तिनं सेंट स्टीफन आणि हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतल्याचं दाखवण्यात आलं आहे.
कसा आहे 'उलझ'चा ट्रेलर : ट्रेलरमध्ये मोठ्या कुटुंबातील सुहाना देशातील सर्वात तरुण उप उच्चायुक्त बनली आहे. सुहानाच्या नियुक्तीमध्ये घराणेशाहीचा मोठा हात असल्याचा आरोप काही लोक करतात. सुहाना लंडन दूतावासात एक इन्फॉर्मर आहे. दरम्यान या पोस्टवर एका युजरनं लिहिलं की, "जान्हवीचा वेगळा अंदाज पाहणे मजेशीर राहणार' दुसऱ्या युजरनं लिहिलं की, "हा चित्रपट मी नक्की पाहणार आहे". 2018 मध्ये जंगली पिक्चर्सच्या बॅनरखाली 'राझी' हा चित्रपट बनवण्यात आला होता. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. आता हीच कंपनी 'राझी' नंतर आणखी एक नवीन गुप्तचर चित्रपट घेऊन येत आला आहे.