महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

वर्षा उसगांवकर यांचा अनादर केल्याबद्दल जान्हवी किल्लेकरला केलं यूजर्सनं ट्रोल - Jahnavi disrespecting Varsha - JAHNAVI DISRESPECTING VARSHA

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी 5'मध्ये जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर यांच्या वाद झाला. आता यानंतर वर्षा उसगांवकर यांचे चाहते जान्हवीला सोशल मीडियाच्या माध्यामातून ट्रोल करत आहे.

Bigg Boss Marathi Season 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 12:44 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस मराठी 5' हा आता खूपचं रंजक झाला आहे. या शोमध्ये घरातील प्रत्येक सदस्य जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहेत. पहिल्या दिवसांपासून बिग बॉसमध्ये अनेक सदस्यांमध्ये कडाक्याचे भांडण होताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी 5' या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रसिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्यापासूनच 'बिग बॉस'च्या घरात दोन गट झाली आहेत. सुरुवातीला निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्या वाद पाहायला मिळाली होता. निक्की या शोमध्ये अनेकदा भांडण करताना चुकीच्या शब्दांचा प्रयोग करताना दिसली आहे.

जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर यांच्या वाद : दरम्यान या शोमध्ये रितेश देशमुखनं भाऊ धक्का (वीकेंड का वार)मध्ये निक्कीची शाळा घेतल्यानंतर ती खूप सांभाळून खेळत आहे. आता जान्हवी किल्लेकर या शोमध्ये सर्वांशी कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर वाद करताना दिसत आहे. जान्हवीनं यापूर्वी सूरज, अभिजीत , आर्या आणि आता वर्षा उसगांवकर यांच्याशी वाद केला. जान्हवी आर्याला 'निर्लज्ज' म्हणत गार्डनमधील भागातून जात असते. यानंतर वर्षा उसगांवकर या तिथे असतात. त्यानं वाटते की, नेहमीप्रमाणे ही पुन्हा भांडण करत आहे. यानंतर जान्हवी त्यांचा गैरसमज दूर न करता वर्षा उसगांवकर यांच्याशी भांडू लागते. या भांडणात ती खूप खालच्या पातळीचं त्यांना बोलते.

जान्हवी किल्लेकर झाली ट्रोल : यानंतर वर्षा जान्हवीला म्हणतात की, "फाल्तू गोष्टींच्या नादी मी लागत नाही." यावेळी अंकितानं सुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करते. जान्हवी यावेळी म्हणचे, "इथे पोरं बसलीत म्हणून तुम्ही इथे येता." यावर वर्षा म्हणते, "अगं पोरं काय म्हणतेस…मी माझ्या नवऱ्याबरोबर खुश आहे." जान्हवी खूप गलिच्छ बोलल्यानंतर आता अनेकजण तिला शोमधून बाहेर काढावे असं म्हणत आहे. आजच्या एपिसोडमध्ये जान्हवी वर्षा यांच्या अभिनय आणि आणि पुरस्कारांबद्दल भाष्य करताना दिसेल. आता जान्हवी प्रेक्षकांच्या नजरेत आली आहे. अनेकजण तिला सोशल मीडियावर खडे बोल सुनावताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी 5'च्या एका व्हायरल क्लिपवर वर्षा उसगांवकर यांच्या एका चाहत्यानं लिहिलं, "जान्हवी तू वर्षा ताईच्या अभिनय विषयी बोलत आहे ना, तू त्यांच्यासमोर शून्य आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "जान्हवीला बाहेर काढा आधी." आणखी एकानं लिहिलं, "जान्हवी तू फक्त नॉमिनेट हो, त्यानंतर आम्ही पाहतो."

सुरज चव्हाणला कशी पाहिजे जोडीदार :आता अनेकजण सोशल मीडियाद्वारे जान्हवीला ट्रोल करत आहेत. तसेच 'बिग बॉस मराठी'च्या 9 ऑगस्टच्या भागात सुरजनं त्याला कशी जोडीदार पाहिजे, याबद्दल त्यानं भाष्य केलं. सुरज हा जान्हवी किल्लेकर, घनःश्याम दरवडे आणि निक्की तांबोळी यांच्याबरोबर गप्पा करताना दिसला. या दरम्यान सुरजनं अनाथ मुलीबरोबर लग्न करणार असल्यास म्हटलं. यानंतर आता सोशल मीडियावर अनेकजण त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. बिग बॉस मराठी सीझन 5च्या दुसऱ्या आठवड्यात कोण झालं नॉमीनेट, घ्या जाणून - BIGG BOSS MARATHI
  2. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान सूरज चव्हाण आणि वैभव चौहानमध्ये झालं भांडण, व्हिडिओ व्हायरल - BIGG BOSS MARATHI
  3. 'बिग बॉस मराठी 5'च्या पहिल्या कॅप्टन्सी बुलेट ट्रेन टास्कमध्ये होणार राडा, पाहा प्रोमो - first captaincy bullet train task

ABOUT THE AUTHOR

...view details