मुंबई - Ali Abbas Zafar :अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट थिएटरमध्ये काही विशेष कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटाच्या अपयशामुळे निर्माते आणि कलाकार खूप चिंतेत होते. चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवसानंतर 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकात मतभेद झाल्याचं आता समजत आहे. यांच्यात पैशांमुळे वाद झाला आहे. हा वाद इतका वाढला, की आता दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत. दिग्दर्शक अली अब्बासनं निर्मात्यांवर पैसे न दिल्याचा आरोप केला आहे. याशिवाय निर्माते वाशू आणि जॅकी भगनानी यांनीही अली अब्बास जफरवर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ? : पूजा एंटरटेनमेंटचे मालक वाशू आणि जॅकी भगनानी यांनी अली अब्बास जफरवर 3 सप्टेंबर रोजी निधीच्या गैरव्यवहाराचा आरोप केला होता. वाशू आणि जॅकी भगनानी यांनी अली अब्बास त्यांनी 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अबुधाबीच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अनुदानाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात अली अब्बास जफरबरोबर आकाश रणदिवे आणि हिमांशू मेहरा यांचीही नावे आहेत. हे प्रकरण फसवणूक, ब्लॅकमेलिंग, चोरी, खंडणी, मनी लाँड्रिंगसंबंधित असल्याचं एफआयआरच्या प्रतीमध्ये सांगण्यात आलंय. या प्रकरणात 9.50 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे.