मुंबई- Babil Khan: बॉलिवूड अभिनेता इरफान खानची 29 एप्रिलला डेथ अॅनिवर्सरी आहे. याआधी मुलगा बाबिल खाननं वडिलांची आठवण करत एक भावनिक नोट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या नोटमध्ये त्यानं लिहिलं, "तू मला योद्धा व्हायला शिकवलं आहेस, तसेच सर्वांना प्रेम आणि दयाळूपणानं जोडायलाही शिकवले आहेस. तू मला आशा शिकवलीस आणि लोकांसाठी लढायला शिकवलेस. तुमचे चाहते, तुमचे कुटुंब आहे आणि मी तुम्हाला वचन देतो बाबा, जोपर्यंत तुम्ही मला बोलावत नाही, तोपर्यंत मी माझ्या लोकांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी लढेन. मी हार मानणार नाही. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो."
बाबिलला दिला चाहत्यांनी दिलासा : आता बाबिलच्या पोस्टवर अनेकज कमेंट्स करून त्याला लढत राहण्याचा सल्ला देत आहेत. एका चाहत्यांनं लिहिलं, "भाऊ सर्व काही ठिक आहे ना? तुझ्यासाठी आता मला चिंता होत आहे, काही असेल तू पोस्टद्वारे सांगू शकतो." दुसऱ्या एकानं लिहिलं, "तूझे वडील हे खूप अष्टपैलू अभिनेता होते आणि त्यांना तुझ्यावर नेहमीच अभिमान होता तू हार मानू नको." आणखी एकानं लिहिलं," नेहमी खुश रहा बाबिल, तुझे वडील तुझ्याबरोबर नेहमीच राहणार." बाबिल खानला त्याच्या साध्या व्यक्तिमत्वासाठी ओळखलं जाते. तो बाकी स्टार किड्स सारखा कुठल्याही पार्टीमध्ये दिसत नाही, पण तरही तो खूप चर्चेत असतो.