महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

भारतानं पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर बॉलिवूड आणि साऊथ स्टार्सनं केला जल्लोष... - IND VS PAK MATCH

पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचं अनेकजण कौतुक करत आहेत. आता बॉलिवूड आणि साऊथ स्टार्सनं देखील टीम इंडियाचं अभिनंदन केलंय.

vicky kaushal- Chiranjeevi- indian team
विकी कौशल-चिरंजीवी-टीम इंडिया (विकी कौशल-चिरंजीवी-टीम इंडिया (IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 24, 2025, 3:37 PM IST

मुंबई : 23 फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानविरुद्ध दुसरा विजय नोंदवला, त्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटी हे सोशल मीडियावर टीम इंडियावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 'छावा' अभिनेता विकी कौशल, साऊथ मेगास्टार चिरंजीवी, अनुपम खेर, जावेद अख्तर आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी टीम इंडियाचं अभिनंदन केलंय. विकी कौशल सध्या त्याच्या नवीन चित्रपट 'छावा'च्या यशाचा आनंद घेत आहे. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून, त्यानं रविवार, 23 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहिला. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची शानदार शतकी खेळी पाहून संपूर्ण देश आनंदात आहे. विकीनं आज, 24 फेब्रुवारी रोजी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर विराट कोहलीचा एक फोटो पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्यानं त्याला 'रेकॉर्ड ब्रेकर, रेकॉर्ड मेकर' असं म्हटलंय.

विकी कौशल (विकी कौशलची इंस्टाग्राम स्टोरी (Instagram))

अनुपम खेर :बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनीही भारताच्या शानदार विजयाचा आनंद साजरा केला, त्यांनी त्यांच्या ऑफिशियल एक्सवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा एक फोटो शेअर केला. यामध्ये विराट कोहली आणि पाकिस्ताननं 242 धावांचे लक्ष्य गाठल्याची झलक दिसते. या पोस्टवर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'भारत माता की जय.'

चिरंजीवी (चिरंजीवीची इंस्टाग्राम स्टोरी (Instagram))

चिरंजीवी :भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी साऊथ मेगास्टार चिरंजीवी दुबईला पोहोचला होता. या शानदार विजयानंतर, मेगास्टारनं त्याच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यानं आपला आनंद व्यक्त केला. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'हुर्रे... भारताचा पाकिस्तानवर शानदार विजय!!! काय मस्त सामना होता. काही प्रिय मित्रांबरोबर हा सुपर थरारक सामना लाईव्ह पाहणे खरोखरच रोमांचक होता. कोहलीची चमकदार फलंदाजी पाहणे खरोखरच एक उत्तम अनुभव होता. श्रेयस अय्यर, शुभमन गिल, कुलदीप आणि कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण संघाचे अभिनंदन. भारताला शुभेच्छा. जय हिंद.'

जावेद अख्तर : प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी भारताच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याच्या एक्स हँडलवर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विराट कोहली आणि टीम इंडियाचं कौतुक केलंय. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'विराट कोहली, दीर्घायुष्य लाभो, आम्हा सर्वांना तुझा खूप अभिमान आहे.'

सिद्धार्थ मल्होत्रा (सिद्धार्थ मल्होत्राची इंस्टाग्राम स्टोरी (Instagram))

सिद्धार्थ मल्होत्रा : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर विराट कोहलीचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सुरुवातीपासून शेवटपर्यंत शानदार कामगिरी, चांगला खेळल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन.'

सामंथा रुथ प्रभू (सामंथा रुथ प्रभूची इंस्टाग्राम स्टोरी (Instagram))

समांथा रूथ प्रभू :साऊथ अभिनेत्री समांथा रूथ प्रभू देखील विराट कोहलीच्या शतकावर खूप आनंद व्यक्त केला आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर विराटच्या 100 सीन्सचा फोटो पोस्ट केला आणि त्यात तिनं एक चमदार इमोजी जोडला आहे. याशिवाय तिनं कोहलीच्या डोक्यावर मुकुटाचा इमोजीही लावला आहे. आता अनेकजण पोस्ट शेअर करून टीम इंडियावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details