महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

गायक एपी ढिल्लननं घराबाहेर गोळीबार प्रकरणी दिली प्रतिक्रिया, लॉरेन्स बिश्नोई-रोहित गोदाराच्या टोळीनं घेतली जबाबदारी - AP DHILLON ON FIRING CASE

AP Dhillon on Firing Case : रॅपर-गायक एपी ढिल्लनच्या कॅनडातील घराबाहेर काही दिवसापूर्वी गोळीबार झाला होता, त्यानं आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई-रोहित गोदाराच्या टोळीनं घेतली आहे.

AP Dhillon on Firing Case
गोळीबार प्रकरणी एपी धिल्लन (एपी ढिल्लन (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 12:23 PM IST

मुंबई - AP Dhillon on Firing Case : गायक-रॅपर अमृतपाल सिंग ढिल्लन उर्फ ​​एपी ढिल्लन यानं कॅनडातील त्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ढिल्लननं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांना सांगितलं आहे की, तो आणि त्यांच्या घरातील सदस्य सुरक्षित आहेत. सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई-रोहित गोदाराच्या टोळीनं याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा कुख्यात गुंड आहे, ज्यानं बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. दरम्यान रविवारी, 1 सप्टेंबर रोजी कॅनडात एपीच्या घराबाहेर गोळीबार झाला होता.

गायक-रॅपरच्या घराबाहेर गोळीबार : आज, 3 सप्टेंबर रोजी, अमृतपाल सिंगनं या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर करून यावर लिहिलं, "मी सुरक्षित आहे. माझ्या घरातील सदस्य सुरक्षित आहेत. मदतीसाठी पुढे आलेल्या सर्वांचे आभार. तुमचा आधार सर्वस्व आहे. सर्वांसाठी शांतीचा संदेश आणि प्रेम." अमृतपाल सिंगच्या घरावर गोळीबार करण्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई-रोहित गोदाराच्या टोळीनं स्वीकारल्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीनं अमृतपाल सिंगला धमकी दिली आहे. धमकी देत त्यांनी बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानबरोबरच्या नात्याबद्दलचा उल्लेख करत अमृतपाल सिंग म्हटलं, आपल्या मर्यादेत राहा, नाहीतर गंभीर मृत्यू होईल."

सलमान खान एपी ढिल्लनचा म्यूझिक व्हिडिओ : एपी ढिल्लननं अलीकडेच सलमान खानबरोबर 'ओल्ड मनी' नावाचा एक म्यूझिक व्हिडिओ लॉन्च केला होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील होता. कॅनडास्थित अमृतपाल सिंग सध्या जगातील सर्वात मोठ्या पंजाबी पॉप स्टार्सपैकी एक आहे. पंजाबमधील गुरदासपूर या छोट्याशा गावापासून तर ब्रिटिश कोलंबिया, कॅनडापर्यंतच्या देशांमध्ये त्याच्या आवाजाला ओळख मिळाली आहे. अमृतपाल सिंगनं आजपर्यंत अनेक गाणी गायली आहेत. यात त्याचं 'ब्राऊन मुंडे' , 'दिल नू', 'टेक ओव्हर', 'विथ यू' आणि 'साडा प्यार' ही गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत.

हेही वाचा :

  1. WPL 2023 : क्रिती सॅनन कियारा अडवाणीचा मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स ; एपी ढिल्लनने ब्राउन मुंडेसह प्रेक्षकांना केले थक्क
  2. WPL 2023 opening ceremony : क्रिती सॅनॉन ते कियारा आडवाणीपर्यंत हे सेलिब्रिटीं 'डब्ल्यूपीएल' उद्घाटन समारंभात करणार सादरीकरण
  3. सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल; 'लॉरेन्स'बाबत पोलिसांचा मोठा दावा - Salman Khan House Firing Incident

ABOUT THE AUTHOR

...view details