मुंबई - ANURAG KASHYAP ON NEWCOMERS : अनुराग कश्यप हा फिल्म इंडस्ट्रीत येऊ पाहणाऱ्या प्रतिभावान कालाकारांचे कलागुण ओळखण्यासाठी जाणला जातो. आतापर्यंत त्यानं अनेक निर्मात्यांना चँपियन बनण्यासाठी मदत केलीय. क्रिएटिव्हिटी आणि बुद्धीमत्ता असलेल्या व्यक्तींचा तो एखादा रत्नपारखी होऊन शोध घेतो. अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते त्याचा सल्ला अनमोल मानतात. मात्र यापुढे अनुराग कश्यपने आपला वेळ आणि सल्ला विनामूल्य देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्याऐवजी सल्लामसलत करण्यासाठी 5 लाखांपर्यंत शुल्क आकारणार असल्याचं जाहीर केलंय.
त्यानं आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर 1.1 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स झाल्यानंतर त्यांच्याबद्दलचा अभिमान बाळगत त्यानं काही मतलबी लोकांबद्दलची नाराजी बोलून दाखवली आहे. कदाचित त्याचा हा निर्णय "शॉर्टकट शोधणाऱ्यांच्या" नाराजीतून आला असावा.
एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अनुराग म्हणाला: "नवीन लोकांना मदत करण्याच्या प्रयत्नात मी बराच वेळ वाया घालवला आणि हाती काहीच लागले नाही. त्यामुळे आता यापुढे मी माझा वेळ अशा स्वतःला हुशार आणि सृर्जनशील समजणाऱ्या लोकांना भेटण्यात वाया घालवू इच्छित नाही. त्यामुळे माझा एक दर असेल. जर कोणाला मला 10-15 मिनिटांसाठी भेटायचे असेल तर मी 1 लाख, अर्धा तासासाठी 2 लाख आणि 1 तासासाठी 5 लाख घेईन. हाच माझा दर आहे. मला लोकांना भेटण्यात वेळ वाया घालवायचा कंटाळा आला आहे. जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की तुम्हाला हे दर परवडतील, तर मला कॉल करा किंवा दूर राहा." अॅडव्हान्स बुकिंग करा असंही म्हणायला अनुराग विसरलेला नाही.
"आपल्या विधानासह त्यानं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, मी म्हटल्या प्रमाणे, मला कोणीही टेक्स्ट मजकूर डीएम किंवा कॉल करू नका. पैसे भरा आणि तुम्हाला वेळ मिळेल. मी धर्मादाय संस्था नाही आणि शॉर्टकट शोधत असलेल्या लोकांमुळे मी कंटाळलो आहे."
तीन दशकांहून अधिक काळ यशस्वी कारकिर्द अनुराग कश्यपने नीरज घायवान सारख्या चित्रपट निर्मात्यांना चॅम्पियन केले आहे. त्याच्या पहिल्याच 'मसान' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'गँग्स ऑफ वासेपूर'च्या सेटवर अनुराग कश्यपला सहाय्यक म्हणून काम केलेल्या विकी कौशलला त्याने हिंदीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक बनवले आहे.