मुंबई - Huma Qureshi : 'महाराणी'मधून लोकप्रिय झालेल्या हुमा कुरेशीला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. तिनं अनेक चित्रपटांमध्ये आणि वेब सीरीजमध्ये काम केलं आहे. 'महाराणी' वेब सीरिजमध्ये दमदार अभिनय करून तिनं सर्वांची मनं जिंकली आहेत. तिला अनेक चित्रपटांच्या आणि वेब सीरीजच्य आता ऑफर्स येऊ लागल्या आहेत. अलीकडेच तिनं तिच्या नवीन प्रोजेक्टवर काम करणं सुरू केलं आहे. आज सोमवारी 15 एप्रिल रोजी हुमानं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पेजवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो तिच्या आगामी चित्रपट 'गुलाबी'च्या सेटवरचे आहेत. तिनं तिच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा करत पोस्टवर लिहिलं, ''गुलाबी' इज हिअर.''
हुमा कुरेशी 'गुलाबी' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र :हुमानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती दिग्दर्शक विपुल मेहता आणि निर्माता विशाल राणा यांच्याबरोबर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. विपुल मेहता यांनी महिला दिनाच्या निमित्त्यानं या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट एका धाडसी महिला ऑटो-रिक्षा चालकाच्या सत्यकथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये एक महिला रोजच्या जीवनामध्ये किती संघर्ष करते हे दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना विशाल राणा यांनी म्हटलं की, ''आज अहमदाबादमध्ये 'गुलाबी'चे शूटिंग सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. प्रेक्षकांना आवडेल असा आशय सादर करणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे.