मुंबई - Top 5 Holi Song : रंगांचा सण होळी हा अनेकांना आवडतो. या सणाच्या निमित्तानं आज देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून होळी सणाच्या शुभेच्छा एकमेकांना देत आहेत. तर काहीजण एकमेकांकडे जाऊन रंगाची उधळण करून हा दिवस साजरा करत आहेत. होळीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी आज पार्ट्या आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. आता या कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीतील काही विशेष गाणी तुम्ही वाजवू शकता. आज तुम्हाला आम्ही बॉलिवूडमधील 5 सुंदर गाणी सांगणार आहोत, ज्यावर आज तुम्ही डान्स करून हा दिवस साजरा करू शकता.
रंग बरसे भीगे चुनरिया : होळी 2024च्या पार्टी गाण्याच्या यादीत तुम्ही हिंदी चित्रपटसृष्टीतील हिट गाणं 'रंग बरसे भीगे चुनरिया' समाविष्ट करू शकता. या गाण्याला स्वतः अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे. आजही हे गाणं ऐकून लोक नाचू लागतात. या गाण्याचे बोल आणि संगीत अनेकांना खूप आवडते.
बलम पिचकारी :'ये जवानी है दिवानी' चित्रपटातील 'बलम पिचकारी' हे सुपरहिट गाणं प्रत्येक होळीला ऐकायला मिळते. तुम्ही तुमच्या यादीत हे देखील समाविष्ट करू शकता. या गाण्याशिवाय होळीची पार्टी अपूर्ण आहे. हे गाणं या दिवसासाठी अगदी योग्य आहे.
बद्रीनाथ की दुल्हनिया :वरुण धवन आणि आलिया भट्ट स्टारर 'बद्री की दुल्हनिया' या चित्रपटातील ''बद्रीनाथ की दुल्हनिया' हे गाणं आज होळीच्या पार्ट्यांमध्ये अनेक ठिकाणी वाजविल्या जातो. त्यामुळे तुम्ही हे गाणं तुमच्या प्ले लिस्टमध्ये नक्की सामिल करू शकता. या चित्रपटातील हे गाणं तुमची होळीची मजा द्विगुणित करेल.
होली खेले रघुवीरा अवध में : होळी 2024 च्या सदाबहार गाण्यांच्या यादीमध्ये 'होली खेले रघुवीरा अवध में' हे गाणं समाविष्ट करून तुम्ही होळी पार्टीला आणखी मजेदार बनवू शकता. अनेकांना हे गाणे खूप आवडते. 2003 मध्ये रिलीज झालेल्या 'बागबान' चित्रपटातील हे गाणं नेहमीच होळीच्या प्ले लिस्टमध्ये असते.
डू मी ए फेवर लेट्स प्ले होली : प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार स्टारर 'वक्त: द रेस अगेंस्ट टाइम' या चित्रपटामधील 'डू मी ए फेवर लेट्स प्ले होली' हे गाणं होलीसाठी अगदी योग्य आहे. या गाण्यावर तुम्ही खूप डान्स करू शकता. हा चित्रपट 2005मध्ये प्रदर्शित झाला होता.
हेही वाचा :
- पहिल्या मुलाच्या स्वागतानंतरच्या पहिल्या पोस्टमध्ये अनुष्का शर्मानं दिल्या होळीच्या शुभेच्छा - Anushka Sharma Holi Wishes
- सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेचा होळी खेळतानाचा न पाहिलेला व्हिडिओ व्हायरल - Sushant and Ankita Video
- एक्स पतीच्या निकाहानंतर राखी सावंतनं शेअर केला वधू वरांच्या पोशाखातील माकडांचा फोटो - Rakhi sawant and Adil khan