मुंबई - Hina Khan Breast Cancer :'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरमुळे चर्चेत आहे. अलीकडेच सोशल मीडियावर तिनं ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. हिना खानला थर्ड स्टेज ब्रेस्ट कॅन्सर आहे हे जाणून अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला. तेव्हापासून सेलेब्स आणि हिना खानचे चाहते ती लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. नुकतीच हिनानं तिच्या केमोथेरपीबद्दल माहिती दिली होती. हिना खानच्या नुकत्याचं केलेल्या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढवल्या आहेत. हिनानं 10 जुलैच्या रात्री तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत लिहिलं, "अल्लाह शिवाय तुमचे दु:ख कोणीही समजू शकत नाही."
हिना खाननं सांगितलं होतं केमोथेरपीबद्दल : या पोस्टमध्ये हिना खान चिंतेत दिसत आहे. हिना खानचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल सुद्धा खूप काळजीत आहे, पण तो हिना बाबतची हिंमत हारलेला नाही. हिना खानला कॅन्सरच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहे. या पोस्टपूर्वी हिना खाननं एक व्हिडिओ शेअर केला होता, यात ती शॉर्ट हेअरकट करताना दिसत होती. पोस्टद्वारे तिनं तिच्या केमोथेरपीबद्दल माहिती दिली होती. याशिवाय एका फोटोंमध्ये केमोथेरपीदरम्यान हिना खानच्या शरीरावर काही कटही दाखवण्यात आले होते.