मुंबई Sanam Teri Kasam 2 : अभिनेता हर्षवर्धन राणे आणि मावरा हुसैन स्टारर 'सनम तेरी कसम' हा चित्रपट 2016 च्या हिटपैकी एक आहे. आज 10 सप्टेंबर रोजी निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. या चित्रपटात हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत परतणार आहेत. 'सनम तेरी कसम 2' या चित्रपटाची टीम या प्रोजेक्टसाठी सर्वोत्तम दिग्दर्शकाच्या शोधात आहे. मंगळवारी हर्षवर्धन राणेनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'सनम तेरी कसम 2' निर्माता दीपक मुकुटबरोबरचा एक फोटो पोस्ट केला. यावर त्यानं कॅप्शन देत लिहिलं, "सनम तेरी कसम 2' अधिकृतपणे बनत आहे. पहिल्या चित्रपटाच्या अप्रतिम प्रेमकथेनंतर आम्ही आणखी काही घेऊन येत आहोत. चित्रपटाच्या अपडेटसाठी संपर्कात राहा. 'सनम तेरी कसम 2"
हर्षवर्धन राणे स्टारर 'सनम तेरी कसम 2'ची अधिकृत घोषणा, चाहत्यांनी सीक्वेलमध्ये केली पाक अभिनेत्री मावरा हुसैनची मागणी - Sanam Teri Kasam Cast
Published : Sep 10, 2024, 4:17 PM IST
Sanam Teri Kasam 2 : हर्षवर्धन राणे अभिनित 'सनम तेरी कसम' या रोमँटिक चित्रपटाच्या सीक्वेलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची पुष्टी केली आहे. सीक्वलमध्ये हर्षवर्धन राणे हा प्रमुख भूमिकेत असेल.
'सनम तेरी कसम 2'चा सीक्वेल : फोटोत हर्षवर्धनच्या हातात स्क्रिप्ट दिसत आहे. पांढरा शर्ट आणि ब्लॅक डेनिम जॅकेटमध्ये तो खूप देखणा दिसत आहे. हर्षवर्धन हा दीपक मुकुटबरोबर कॅमेरासाठी पोझ देत आहे. दीपक मुकुट यांनी हर्षवर्धन राणेबरोबर 'सनम तेरी कसम 2' ची घोषणा केली. चित्रपटाच्या घोषणेनंतर, निर्माते पाकिस्तानी अभिनेत्री मावराला सीक्वेलमध्ये कास्ट करतील की नाही, यावर चाहते अंदाज लावत आहेत. या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरनं लिहिलं की, "सनम तेरी कसम 2' मावराशिवाय अशक्य आहे."आणखी एका यूजरनं लिहिलं, "आम्हाला मावरा हिरोईन म्हणून हवी आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "मावरा ही चित्रपटामध्ये असायला पाहिजे."
'सनम तेरी कसम' ऑक्टोबरमध्ये पुन्हा प्रदर्शित होईल : दीपक मुकुट (सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट)नं ' सनम तेरी कसम'च्या दुसऱ्या भागाची घोषणा केली. दुसऱ्या भागात प्रेक्षकांना खूप काही वेगळं पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या ऑक्टोबरमध्ये पहिला भाग चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या अपडेटबद्दल माहिती देताना, टीममधील एका सदस्यानं सांगितलं, "सनम तेरी कसम 2'ची पुष्टी झाल्याचं जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. यामध्ये हर्षवर्धन राणे पुन्हा एकदा मुख्य अभिनेता म्हणून दिसणार आहेत. सीक्वेलची कहाणी ठरली आहे. दिग्दर्शकाची निवड होणे बाकी आहे." आता अनेकजण या चित्रपटसाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.