बैरुत- लेबेनॉन पेजरनंतर वॉकी-टॉकीज आणि सौर उर्जेच्या उपकरणातील स्फोटानं दुसऱ्यांदा हादरलं आहे. या स्फोटामध्ये हिजबुल्लाह संघटनेचे दहशतवादी, सरकारी माध्यम आणि सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. दुसऱ्यांदा झालेल्या स्फोटामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. तर ४५० हून अधिक जखमी झाल्याची माहिती लेबेनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिली.
लेबेनॉनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं बैरुतमधील अनेक घरात असलेल्या सौर उर्जा उपकरणांमध्ये स्फोट झाल्याचं म्हटलं आहे. तर हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांकडून वापरण्यात येणाऱ्या वॉकीटॉकीचे स्फोट झाले आहेत. लेबेनॉनमध्ये इस्रायलनं स्फोट घडवून आणल्याचं मानलं जात आहे. पण, या स्फोटात दहशतवाद्यांबरोबर निष्पाप नागरिकांचेदेखील मृत्यू झाले आहेत. लेबेनॉनमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
स्फोट कसा घडला? इस्त्रायलनं पेजरमधून स्फोट कसा घडविला, याचे जगभरातील तज्ञांना कोडे पडले आहे. लेबेनॉनमध्ये पेजरचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या पुरवठा साखळीत इस्त्रायलकडून हस्तक्षेप करण्यात आल्याचं मानले जात आहे. मात्र, स्फोट झालेल्या पेजरच्या कंपनीनं उत्पादन हे हंगेरीमधील बुडापेस्टमध्ये करण्यात आल्याचा दावा केला. त्यानंतर हंगेरीच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थांनी आंतरराष्ट्रीय भागीदारांबाबत स्फोटाचा तपास करण्यासाठी सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पहिल्या स्फोटातून सावरण्यापूर्वीच दुसऱ्यांदा स्फोट झाल्यानं लेबेनॉनमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे.
इस्त्रायलकडून अप्रत्यक्षपणे कबुली-इस्त्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांनी सैन्यदलाच्या एका तुकडीशी बोलताना लेबेनॉनमधील स्फोटाचा उल्लेख न करता वक्तव्य केलं आहे. "आपण एका नव्या युद्धाला सुरुवात केली आहे. त्यासाठी धाडस, निर्धार आणि खंबीरपणा लागतो." यावेळी संरक्षण मंत्र्यांनी इस्त्रायलच्या सैन्यदलाचे आणि सुरक्षा संस्थांचे कौतुत केलं. परिणाम अत्यंत प्रभावी असल्याचं सांगत लेबेनॉनमधील स्फोटामागे इस्त्रायलचा हात असल्याचं एकप्रकारे संकेत दिले आहेत.
लेबेनॉन आणि इस्त्रायलमधील संघर्ष युद्धाच्या उबंरठ्यावर- नागरिकांकडून वापरण्यात येणाऱ्या डिव्हाईसचा वापर शस्त्र म्हणून करण्यावर कठोर निर्बंध असल्याचं इंडियानामधील युनिव्हर्सिटी ऑफ नोटरे डेमचे प्राध्यापक मेरी एलेन ओ कोन्नेल ( कायदा आणि आंतरराष्ट्रीय शांतता) यांनी सांगितलं. सीमेवरून परतणाऱ्या इस्त्रायलच्या नागरिकांवरील हल्ले थांबविले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा यापूर्वीच इस्त्रायलाच्या नेत्यांनी दिला होता. लेबेनॉनमध्ये पेजरचे स्फोट झाल्यानंतर हिजबुल्लाह या संघटनेनं इस्त्रालयच्या उत्तर भागात बुधवारी तीन हवाई हल्ले केले. हीच परिस्थिती राहिली तर लेबेनॉन आणि इस्त्रायलमधील संघर्ष युद्धाच्या उबंरठ्यावर पोहोचू शकतो.
हेही वाचा-