मुंबई - Singham Again Vs Bhool Bhulaiyaa : अभिनेता अजय देवगण आणि करीना कपूर खान स्टारर कॉप ॲक्शन चित्रपट 'सिंघम अगेन' संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदललेली नाही. 'सिंघम अगेन' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल, असं सांगण्यात आलं होतं. यानंतर कार्तिक आर्यननं रोहित शेट्टीला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याची विनंती केली. दिग्गज चित्रपट समीक्षक तरण आदर्श त्यांच्या ताज्या पोस्टमध्ये या सर्व अनुमानांना नाकारलं आहे. 'भूल भुलैया 3' हा चित्रपट दिवाळीच्या दिवशी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाबाबत बराच गाजावाजा झाला होता. या चित्रपटाची रिलीज डेट देखील पुढे ढकलण्यात आली होती. आता 'सिंघम अगेन' दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यन स्टारर 'भूल भुलैया 3'ला टक्कर देईल.
दिवाळीला होईल धमाका : तरण आदर्शनं त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं की, "सिंघम अगेन हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होईल, या चित्रपटाची डेट पुढे ढकलण्यात आलेली नाही. 'सिंघम अगेन' चित्रपटाला नवीन तारीख दिली गेली नाही. हा चित्रपट दिवाळीत येत आहे. लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया' या दोन्ही चित्रपटांची टक्कर दिवाळीत बॉक्स ऑफिसवर होईल." 'सिंघम अगेन' याआधी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट 'पुष्पा 2 द रुल'ला टक्कर देणार होता. हे दोन्ही चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होते, मात्र या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख बदललेली आहे.
मोठ्या पडद्यावर होईल 'या' चित्रपटांची टक्कर : 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला 'स्त्री 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. 'स्त्री 2' भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 'पुष्पा 2' बद्दल बोलायचं झालं तर हा 6 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. याच दिवशी विकी कौशल स्टारर 'छावा' चित्रपट रिलीज होणार आहे. आता दोन्ही मोठ्या चित्रपटांची टक्कर देखील डिसेंबरमध्ये होईल. दरम्यान 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3'बद्दल बोलायचं झालं तर या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षक खूप आतुरतेनं वाट पाहात आहेत. आता रुपेरी पडद्यावर कुठला चित्रपट बाजी मारेल हे काही दिवसात कळेल.
हेही वाचा :
- अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' शी होणारी लढत टाळण्यासाठी 'सिंघम अगेन' चित्रपटाची रिलीज तारीख बदलली - Allu Arjun Pushpa 2
- Stri and Singham : 'स्त्री'चा दुसरा आणि 'सिंघम'चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला! - Stri and Singham sequel
- 'पुष्पा' समोर झुकला 'सिंघम'?, बदलली 'सिंघम अगेन'ची रिलीज तारीख, 'रूह बाबा'शी होऊ शकतो सामना - Singham Again release date