ETV Bharat / bharat

तिरुपतीच्या लाडूत तुपाऐवजी चरबीचा वापर, चंद्राबाबू नायडू यांचे वायएसआर काँग्रेसवर आरोप - Chandrabau Naidau News - CHANDRABAU NAIDAU NEWS

chandrababu Naidu News वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात (YSRCP government) तिरुपती देवस्थानकडून देण्यात येणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात येत होती, असा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केला. चंद्राबाबूंचे आरोप वायएसआरसीपीच्या नेत्यांनी फेटाळले आहेत.

chandrababu naidu News
चंद्राबाबू नायडू (Source- ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2024, 8:58 AM IST

अमरावतीchandrababu Naidu News- तिरुपती देवस्थानकडून देण्यात येणारे लाडू भाविकांमध्ये प्रसिद्ध आहेत. या लाडूमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कारण, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती देवस्थानकडून देण्यात येणाऱ्या लाडूमध्ये जनगमोहन सरकारच्या काळात प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा दावा केला.

"तिरुपती लाडू हे निकृष्ट घटकांचा वापर करून तयार करण्यात येत होते. तुपाऐवजी ते प्राण्यांची चरबी वापरत होते," असा गंभीर आरोप चंद्राबाबू यांनी एनडीएच्या बैठकीत केला. "आता शुद्ध तुपाचा वापर करण्यात येत आहे. मंदिरामधील प्रत्येक गोष्ट सॅनिटाईज केली जात असल्यानं गुणवत्ता सुधारली आहे," अशी माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली.

धार्मिक भावनांचा आदर नाही-दुसरीकडं आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान मंत्री नारा लोकेश यांनी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, " तिरुमला येथील व्यकंटेश्वरा स्वामी मंदिर हे आमचे सर्वात पवित्र मंदिर आहे. तिरुपतीच्या प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती, हे समजल्यानंतर मला मोठा धक्का बसला. ते (वायएसआर काँग्रेस) कोट्यावधी जनतेच्या धार्मिक भावनांचा आदर करू शकत नाही," असा आरोपदेखील मंत्री लोकेश यांनी केला.

देवासमोर शपथ घ्या- चंद्राबाबू यांच्या आरोपावर वायएसआरसीपीचे नेते तथा टीटीडीचे चेअरमन सुब्बा रेडी यांनी एक्स सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. वायएसआरसीपीचे नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्बा रेड्डी यांनी तिरुपती देवस्थान ट्रस्टचे चेअरमन म्हणून दोन वेळा जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी एक्स सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले," राजकीय फायदा घेण्यासाठी टीडीपीचे प्रमुख झुकत आहेत. चंद्राबाबूंनी पवित्र तिरुमला देवस्थानच्या पावित्र्याची अत्यंत हानी केली. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे आरोप तथ्यहीन आणि धार्मिक भावनांना धोकादायक आहेत. चंद्राबाबूंनी देवासमोर शपथ घेऊन हा दावा करावा," असे आव्हानही त्यांनी दिलं आहे.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.