मुंबई :'हरि हर वीर मल्लू'च्या निर्मात्यांनी आज, 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती आणि पोंगलच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचा पहिला एकल प्रोमो रिलीज केला आहे. पवन कल्याण स्टारर या चित्रपटाच्या प्रोमोमध्ये गाण्याची रिलीज तारीख देखील उघड करण्यात आली आहे. हे गाणं चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मंगळवारी, निर्मात्यांनी 'हरि हरा वीरा मल्लू' पहिला एकल प्रोमो रिलीज करून पवन कल्याणच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या चार भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.
'हरि हर वीर मल्लू' चित्रपटामधील गाणं होईल 'या' दिवशी प्रदर्शित : निर्मात्यांनी 'हरि हर वीर मल्लू'च्या पहिल्या सिंगल प्रोमोची यूट्यूब लिंक शेअर करताना यावर लिहिलं, 'हरि हरा वीरा मल्लू'चा पहिला सिंगल प्रोमो आता प्रदर्शित झाला आहे.' दरम्यान या प्रोमोची सुरुवात घनदाट जंगलानं होते. पार्श्वभूमीत पवन कल्याणचा आवाज ऐकू येतो. यामध्ये तो एक इशारा देत म्हणतो, "ऐका... जर वीर मल्लू बोलला तर... त्याचे ऐका." प्रोमोमध्ये गाण्याच्या रिलीज तारखेची माहिती देखील देण्यात आली आहे. 'हरि हरा वीरा मल्लू' चित्रपटामधील गाणं 17 जानेवारी सकाळी 10.20 वाजता प्रदर्शित होणार आहे.