मुंबई - संपूर्ण देश आज 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी साजरी करीत आहे. बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्स चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यामातून देत आहोत. आता हा उत्सव चित्रपटसृष्टीतही मोठ्या थाटात साजरा केला जातोय. या विशेष प्रसंगी सोशल मीडियावर काही स्टार्सनं पोस्ट शेअर केल्यात. ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये शुभेच्छा देताना तिनं लिहिलं आहे की, 'जेव्हा तुम्हाला घाबरवणाऱ्या गोष्टीचा सामना करावा लागतो, तेव्हाच तुमचे आयुष्य उत्तम बनते, जे तुम्हाला नेहमीच हवं असतं. दसऱ्याच्या शुभेच्छा.' याशिवाय चित्रपट निर्माता रोहित शेट्टी, संजय दत्त, विकी कौशल, सुनील शेट्टी, कंगना रणौत, करिना कपूर, परिणीती चोप्रा, शाहिद कपूर आणि इतर बॉलिवूड स्टार्सनी विजयादशमीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्यात.
काजोलची गंमतीशीर पोस्ट : काजोलनं मजेशीर पद्धतीनं तिच्या चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यात. तिनं इन्स्टाग्रामवर तिची एक क्लिप शेअर केलीय, ज्यामध्ये ती चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. काजोलनं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, 'सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!,' असं लिहिलंय. या पोस्टमध्ये तिनं एक मजेदार इमोजीदेखील जोडला आहे. बॉलिवूड स्टार शाहिद कपूरनं त्याच्या एक्सवरील पोस्टमध्ये 'दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!' असं म्हटलंय.