महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अंगद बेदीनं नेहा धुपियाचा वाढदिवस मध्यरात्री केला साजरा, बॉलिवूड स्टार्सनी दिल्या शुभेच्छा - Neha Dhupia - NEHA DHUPIA

Happy Birthday Neha Dhupia : नेहा धुपियाचा आज 44वा वाढदिवस आहे. या विशेष प्रसंगी पती अंगद बेदीनं तिला अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Neha Dhupia
नेहा धुपिया (instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 27, 2024, 4:08 PM IST

मुंबई - Happy Birthday Neha Dhupia :अभिनेत्री नेहा धुपिया आज 27 ऑगस्ट रोजी 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी नेहा धुपियाला अनेकजण शुभेच्छा देत आहेत. अंगद बेदीनं पत्नी नेहाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अलीकडेच, अंगद आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवमध्ये गेला. तिथे त्याने नेहाला एक सुंदर सरप्राईज दिलं. अंगदनं नेहा धुपियाबरोबरचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, "माझ्या सुंदर मुलांच्या आईला आणि अद्भुत स्त्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यूनिवर्समधील सर्वात सुंदर स्त्रीवर खूप प्रेम."

अंगद बेदीचं पत्नी नेहाला सरप्राईज :पोस्टच्या पहिल्या फोटोत अंगद आणि नेहा रोमॅंटिक मूडमध्ये दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही बीचजवळ उभं राहून मस्त पोझ देताना दिसत आहे. तर शेवटी अंगदनं एक व्हिडिओ क्लिप जोडली आहे, यात तो मध्यरात्री नेहासाठी वाढदिवसाचं गाणं गाऊन तिला सप्राईज देताना दिसत आहे. आता अंगदनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून नेहा धुपियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याशिवाय या विशेष प्रसंगी नेहाला बॉलिवूडमधील काही स्टार्सनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करीना कपूर आणि मलायका अरोरा दिल्या शुभेच्छा : करीना कपूर आणि मलायका अरोरा यांनीही नेहाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीनानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नेहाचा एक मोनोक्रोम फोटो पोस्ट केला आहे. यावर तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा, गुरिकची आई. तुझ्यावर प्रेम करते." यानंतर मलायका अरोरानेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हाच फोटो पोस्ट केला आणि लिहिलं, "हॅपी बर्थडे डिअर नेहा. खूप प्रेम आणि आनंदी राहा." याशिवाय शिल्पा शेट्टी, रकुल प्रीत सिंग, जॅकी भगनानी, दिया मिर्झा यांच्यासह अनेक स्टार्सनी नेहा धुपियाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान नेहाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची 'बॅड न्यूज' या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी वर्क दिसले होते. या चित्रपटातल्या नेहाच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं.

हेही वाचा :

  1. विजय सेतुपती आणि कतरिनाच्या मेरी ख्रिसमसचं नेहा धुपियानं केलं कौतुक
  2. demise of Bishan Singh Bedi : अंगद बेदी, नेहा धुपिया आणि कुटुंबीयांनी बिशन सिंग बेदींच्या निधनानंतर लिहिली हृदयस्पर्शी चिठ्ठी
  3. Neha Dhupia : नेहा धुपियाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीसोबतचे शेअर केले फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details