महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'हनुमान' स्टार तेजा सज्जा त्याच्या आगामी 'सुपर योद्धा'चित्रपटासाठी सज्ज - Hanuman star Teja Sajja - HANUMAN STAR TEJA SAJJA

Hanuman star Teja Sajja : हनुमान या सुपरहिरो चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता तेजा सज्जा आता आणखी एका सुपरहिरो चित्रपटात काम करणार आहे. निर्माता कार्तिक गट्टमनेनी यांच्या 'सुपर योद्धा' या चित्रपटात काम करणार असल्याची घोषणा झाली आहे. या चित्रपटाचं 18 एप्रिल रोजी चित्रपटाचं शीर्षक आणि फर्स्ट लुक प्रसिद्ध होणार आहे.

Hanuman star Teja Sajja
तेजा सज्जा

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 12:29 PM IST

मुंबई -Hanuman star Teja Sajja: 'हनुमान' असं शीर्षक असलेला भारतीय सुपरहिरोचा धमाल चित्रपट जानेवारी महिन्यात रिलीज झाला आणि अभिनेता तेजा सज्जा हे नाव घराघरात पोहोचलं. 40 कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 227 कोटींची कमाई करुन निर्मात्यांच्या भुवया उंचवल्या. ग्लोबल मार्केटमध्ये हा चित्रपट लोकप्रिय झाला. 294 कोटींची कमाई करण्याची किमया या चित्रपटानं साधली. या चित्रपटामुळं लोकप्रिय बनवलेला स्टार तेजा सज्जा यानं नवा चित्रपटासाठी करार केला आहे. निर्माता कार्तिक गट्टमनेनी यांच्या बरोबर तो 'सुपर योद्धा' या आगामी चित्रपटात काम करणार आहे.

कार्तिक गट्टमनेनी यांनी चित्रपटाच्या शीर्षकाबद्दलची उत्सुकता वाढवण्यासाठी एक्स सोशल मीडियावर पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टरमध्ये तेजा सज्जा कॅमेऱ्याकडे पाठ दाखवून उभा असलेला दिसतो. त्याच्या कपड्यावर शस्त्र आणि गोळ्यांच्या जखमा दिसत आहेत. 18 एप्रिल रोजी चित्रपटाचं शीर्षक आणि फर्स्ट लुक समोर येईल.

पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिले, "आमच्या प्रतिष्ठित PMF36 साठी सुपरहीरोतेजा सज्जा बरोबर सामील होताना आनंद झाला. सुपर योद्धाची साहसी गाथा. 18 एप्रिल रोजी शीर्षक घोषणेसह झलक पाहा आणि आमच्या बरोबर रहा."

प्रशांत वर्मा दिग्दर्शित त्याच्या 'हनुमान' या सुपरहिरो चित्रपटाबद्दल बोलायचे तर, या सुपरहिरो चित्रपटात तेजा सज्जा, वरलक्ष्मी सरथकुमार, अमृता अय्यर आणि विनय राय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आणि त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट प्राईम व्हिडिओ ओटीटीवर प्रवाहित झाला असून जगभरातील प्रेक्षक याचा आनंद घेत आहेत.

तेजा सज्जा यांनी त्यांच्या चित्रपटाविषयी आधी एएनआयला सांगितलं होतं की, "सुपरहिरो चित्रपट करण्याची कल्पना माझ्यासाठी खूप रोमांचक होती. संपूर्ण प्रक्रियेतच रोमांच अनुभवला. या चित्रपटात एका लहान मुलाला भगवान हनुमानाच्या कृपेने शक्ती मिळते आणि मग तो कसा त्याच्या लोकांसाठी आणि त्याच्या धर्मासाठी उपयोग करतो हे या चित्रपटात दाखवलंय. यामध्ये सुपरहिरो अ‍ॅक्शन सीक्वेन्स आहेत आणि त्याच वेळी, यामध्ये आमचा इतिहास आमच्यामध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला आहे. सुपरहिरो संकल्पनेसह भारतीय 'इतिहास' असलेला हा एक अतिशय मनोरंजक चित्रपट आहे."

हेही वाचा -

'गदर 2' दिग्दर्शक अनिल शर्मानं 'पुष्पा 2' आणि अल्लू अर्जुनचं केलं कौतुक, पाहा पोस्ट - Allu Arjun

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर राखी सावंत आली त्याच्या समर्थनार्थ पुढे, व्हिडिओ व्हायरल - Rakhi Sawant

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या लॉन्चनंतर पहिल्यांदाच कपिल शर्मानं दिली वैष्णोदेवी मंदिराला भेट - Kapil Sharma

ABOUT THE AUTHOR

...view details