महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

महाराष्ट्रात चित्रपट महोत्सव आयोजित करणाऱ्या संस्थासाठी शासनाचं अर्थसहाय्य, सांस्कृतिक कार्य विभागाची योजना - FUNDING FOR FILM FESTIVALS

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारनं आर्थिक पाठबळ देऊ केलंय. अशा संस्थांना किमान 10 लाखाहून अधिक रक्कमेचं आर्थसहाय्य दिलं जाणार आहे.

FUNDING FOR FILM FESTIVALS
चित्रपट महोत्सवाला अर्थसहाय्य (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 7, 2025, 7:48 PM IST

मुंबई - जगभरात प्रदर्शित होणारे उत्तम आणि आशयघन चित्रपट राज्यातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध संस्था दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचं (International Film Festival) आयोजन करत असतात. अशा संस्थांसाठी शासन अर्थसहाय्य योजना राबवत असून या महोत्सवांना किमान १० लाखाहून अधिकचं आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

“आंतरराष्ट्रीय चित्रपट, लघूपटांचे आयोजन करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य”, अशा नावाची योजना सांस्कृतिक कार्य विभागानं जाहीर केली असून याची अंमलबजावणी महाराष्ट्र महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे करण्यात येत आहे.

सद्यच्या स्थितीमध्ये पुणे फिल्म फाऊंडेशन आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF), मराठवाडा आर्ट, कल्चर अॅंड फिल्म फाऊंडेशन आयोजित अजिंठा-वेरुळ चित्रपट महोत्सव (AIFF), द आशियाई फिल्म फाऊंडेशन आयोजित आशियाई चित्रपट महोत्सव, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित यशवंत चित्रपट महोत्सव, मीडिया सोल्युशन पुणे आयोजित अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांसह इतर काही संस्थांना शासन अर्थसहाय्य करत आहे.

अशी आहे योजना - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचं आयोजन करणाऱ्या संस्थांना 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर निकषांची पूर्तता करणाऱ्या १० संस्थांना प्रती वर्षी १० लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे.

योजनेसाठी 'या' आहेत अटी-शर्ती

  • - ही योजना चित्रपट, माहितीपट व लघुपट महोत्सावाचं आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी लागू आहे.
  • - संस्थांनी आयोजनापूर्वी प्रस्ताव महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे सादर करणं बंधनकारक आहे.
  • - महोत्सवानंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाना अर्थसहाय्य मिळत नाही.
  • - महोत्सवामध्ये जागतिक, राष्ट्रीय व नावाजलेले चित्रपट/ माहितीपट/लघुपट यांचा समावेश असावा.
  • - संस्थेने त्यांच्या किमान 3 वर्षाच्या कार्याचा अहवाल सादर करणं बंधनकारक आहे.
  • - संस्थेने मागील 3 वर्षाचे सनदी लेखापालानं लेखा विषयक अहवाल सादर करणं बंधनकारक आहे.

अशा प्रकारच्या अटी-शर्ती असून जास्तीत जास्त संस्थांनी या योजनेला लाभ घ्यावा, असं आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details