मुंबई - Thalapathy Vijay birthday :साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय थलपथीआज 22 जून रोजी आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्यानं त्याच्या चाहत्यांना 'ग्रेट ऑफ ऑल टाईम' ( G.O.A.T ) या नवीन चित्रपटातून एक नवीन भेट दिली आहे. थलपथी विजयचा G.O.A.T हा चित्रपट या वर्षीच प्रदर्शित होणार असून त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यानं अनोखा भेट दिली आहे. त्यानं चित्रपटाचा अॅक्शन आणि स्टंटफुल टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये थलपथी विजयची दुहेरी भूमिका दिसत आहे. त्यामुळे विजयच्या चाहत्यांचा आनंदही द्विगुणित झाला आहे.
G.O.A.T चा टीझर आश्चर्यचकित करणारा
या टीझरची सुरुवात अॅक्शनने होते आणि विजयच्या मागे काही बाईकस्वार आणि कार पाठलाग करत आहेत आणि अॅक्शनमध्ये विजय त्याच्याच तंद्रीत बाइक चालवत आहे. मात्र, टीझरचा शेवटचा सीन सर्वात आश्चर्यचकित करणारा आणि रोमांच वाढवणारा आहे. टीझरच्या शेवटी, विजय बाईकवर फिरतो आणि त्याची दुहेरी भूमिका चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का ठरते.
या चित्रपटाचं दुसरे गाणं आज रिलीज होणार