मुंबई - राम चरण आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'गेम चेंजर' हा या आठवड्यातील सर्वात चर्चेत असलेला नवीन रिलीज चित्रपट आहे. संक्रांती-पोंगलच्या निमित्तानं प्रदर्शित झालेल्या शंकर दिग्दर्शित चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर एंट्री केली आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, राम चरण अभिनीत या चित्रपटाचा पहिला दिवस खूप चांगला गेला. पहिल्या दिवशी १०० कोटी रुपयांची कमाई करून जगभरात या चित्रपटानं नेत्रदीपक ओपनिंग केली आहे. भारतातही ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्यात हा सिनेमा यशस्वी झालाय. असं असलं तरी, एवढी मोठी कमाई करूनही, अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' आणि ज्युनियर एनटीआरचा 'देवरा: पार्ट १' चित्रपटाचा विक्रम मोडू शकलेला नाही.
'गेम चेंजर'चा बॉक्स ऑफिस कलेक्शन पहिला दिवस
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालांनुसार, 'गेम चेंजर'नं पहिल्या दिवशी भारतात ५१.२५ कोटी रुपये कमावले आहेत. या रिपोर्टनुसार, राम चरण अभिनीत या चित्रपटानं तेलुगू भाषिक आंध्र आणि तेलंगणा राज्याचा पट्ट्यात सर्वाधिक कमाई केली. तेलुगूमध्ये या चित्रपटानं ४२ कोटी रुपये कमावले, तर तमिळमध्ये २.१ कोटी रुपये कमावले आहेत. शंकरच्या चित्रपटानं हिंदीमध्ये ७ कोटी रुपयांचा व्यवसाय केलाय. तर मल्याळम आणि कन्नडमध्ये अनुक्रमे ५ लाख आणि १ लाख रुपये कमावले आहेत.
'गेम चेंजर' चित्रपटाच्या तेलुगू भाषेतील आवृत्तीला भारतभर ३८६३ शो मिळाले. तमिळमध्ये अंदाजे ६५० आणि हिंदीमध्ये २४८५ शो होते. हा चित्रपट निवडक चित्रपटगृहांमध्ये 2D आणि IMAX 2D मध्ये प्रदर्शित झाला आहे.
'गेम चेंजर' दिवस पहिला जागतिक कलेक्शन