महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'या' बॉलिवूड अभिनेत्रीनं घेतला सन्यास, फिल्मी जग सोडून बनली भिक्षू, अक्षय कुमारसह केलं होतं पदार्पण - BOLLYWOOD ACTRESS BECAME A MONK

बॉलिवूडमधील माजी अभिनेत्री बरखा मदन हिनं २०१२ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला होता. आता ती भिक्षू बनली असून याबद्दल अधिक जाणून घ्या.

Monk Representative image
भिक्षू प्रतिनिधीत फोटो (Representative image (Photo: Gettty))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 13, 2025, 3:53 PM IST

मुंबई - माजी मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री बरखा मदन हिनं २०१२ मध्ये स्वतःचं जीवन बदलून टाकणारा निर्णय घेतला होता. तिनं फिल्मी जगताला राम राम टोकून अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्यानं अनेकांना आस्चर्य वाटलं होतं. ग्याल्टेन सामतेन असं नाव धारण केलेलेल्या या माजी अभिनेत्रीला आज एक बौद्ध भिक्षू म्हणून ओळखले जातं. अध्यात्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेणारी बरखा मदन ही एकमेव बॉलिवूड कालाकार नाही.

फिल्म इंडस्ट्रीपासून अध्यात्माच्या मार्गापर्यंतचा बरखाचा प्रवास प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक आहे. अभिनय सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, तिनं बॉलीवूडमध्ये यशस्वी कारकीर्द केली होती. १९९६ मध्ये बरखानं अक्षय कुमारबरोबर 'खिलाडियों का खिलाडी' या हिट अॅक्शन चित्रपटातून पदार्पण केलं होतं. हा चित्रपट खूप यशस्वी झाला होता.

यानंतर राम गोपाल वर्माच्या सुपरनॅचरल थ्रिलर 'भूत' या २००३मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटानं तिला चांगली ओळख मिळाली. तिच्या भूमिकेचं समीक्षकांनीही भरपूर कौतुक केलं होतं. यामुले तिची प्रसिद्धी खूप वाढली. या चित्रपटात उर्मिला मातोंडकर, नाना पाटेकर, रेखा, अजय देवगण आणि इतर कलाकारांचा समावेश असूनही ती चित्रपटात वेगळी दिसली होती.

केवळ अभिनय क्षेत्रातच नाही, तर मॉडेलिंग उद्योगातही बरखा एक प्रसिद्ध चेहरा होती. तिनं १९९४ च्या मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता.यामध्ये तिनं ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन यांच्याशी स्पर्धा केली होती. बरखानं नंतर मिस टुरिझम इंडियाचा किताबही जिंकला होता.

तिच्या सौंदर्य स्पर्धांच्या जगातल्या कामगिरीनंतर अनेक वर्षे टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपटांमध्येही तिनं अभिनय केला. तिच्या अल्पायुषी अभिनय कारकिर्दीत, ती न्याय आणि सात फेरे - सलोनी का सफर यासारख्या विविध टीव्ही शोमध्ये दिसली. असं असली तरी आशादायक कारकिर्द असूनही, बरखानं आध्यात्मिक आवाहन अनुभवलं आणि प्रसिद्धी आणि संपत्तीच्या पलीकडे उद्देशपूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न केला.

२०१२ मध्ये बरखाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि भिक्षू बनली. ग्याल्टेन सामतेन या नावानं, तिनं स्वतःला दलाई लामांच्या शिकवणींमध्ये समर्पित केले आणि पर्वतीय मठांमध्ये राहणं निवडलं. इंस्टाग्रामवर तिच्या आध्यात्मिक प्रवासाची झलक पाहायला मिळते.

बरखाची कहाणी झायरा वसीम, सना खान, विनोद खन्ना आणि इतर कलाकारांची आठवण करून देणारी आहे ज्यांनी फिल्मी जगताला सोडून देऊन अध्यात्माचा मार्ग स्वीकारला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details