महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

फिल्मफेअर पुरस्कारामध्ये 'ॲनिमल' आणि 'ट्वेल्थ फेल'चा बोलबाला ; पाहा यादी - फिल्मफेअर पुरस्कार 2024

Filmfare Awards 2024 Full Winners List : 69 व्या फिल्मफेअर पुरस्कार हा गुजरातमधील गांधीनगर झाला. या कार्यक्रमात 'ॲनिमल' आणि 'ट्वेल्थ फेल'नं चांगलेच पुरस्कार पटकावले आहेत.

Filmfare Awards 2024 Full Winners List
फिल्मफेअर पुरस्कार 2024 पूर्ण विजेत्यांची यादी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2024, 11:28 AM IST

Updated : Jan 29, 2024, 3:20 PM IST

गांधीनगर- Filmfare Awards 2024 Full Winners List : 69 व्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. 27 आणि 28 जानेवारी रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे 69 व्या फिल्मफेअर पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला दिवस चित्रपटांना तांत्रिक पुरस्कार देण्यासाठी समर्पित होता. यामध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीताचा पुरस्कार ॲनिमलला देण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा अवार्ड 'थ्री ऑफ अस'ला मिळाला. याशिवाय सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन आणि कॉस्च्युम डिझाइनचा पुरस्कार विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर'ला देण्यात आला. सर्वोत्तम व्हीएफएक्स 'जवान'ला दिला गेला. 'ट्वेल्थ फेल'ला सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार मिळाला.

'ॲनिमल' आणि 'ट्वेल्थ फेल'चा दबदबा : दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 जानेवारी रोजी रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल' आणि विधू विनोद चोप्राच्या 'ट्वेल्थ फेल'नं पुरस्कार सोहळ्यावर वर्चस्व गाजवले आहे.'ट्वेल्थ फेल'ला चार श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. तर 'ॲनिमल'नं तीन पुरस्कार पटकावले आहेत. फिल्मफेअर पुरस्कारांच्या कार्यक्रमात अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी स्टेजवर डान्स करून सर्वांचे मनोरंजन केले. आता सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि लाइफ टाईम अचिव्हमेंटसाठी कोणीची निवड झाली हे आपण या बातमीत पाहूया.

69 व्या फिल्मफेअर पुरस्कारांची संपूर्ण यादी

  • जीवनगौरव पुरस्कार

डेव्हिड धवन (दिग्दर्शक)

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक

जोराम

  • सर्वोत्तम दिग्दर्शक

विधू विनोद चोप्रा - चित्रपट: 'ट्वेल्थ फेल'

  • सर्वोत्तम चित्रपट

'ट्वेल्थ फेल'

  • सर्वोत्तम अभिनेत्री

आलिया भट्ट - चित्रपट: रॉकी और रानी की प्रेम कहानी

  • सर्वोत्तम अभिनेता

रणबीर कपूर चित्रपट: 'ॲनिमल'

  • सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता पुरुष

आदित्य रावल चित्रपट: फराज

  • सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री

अलिझेह अग्निहोत्री चित्रपट: फारे

  • सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक

तरुण दुडेजा चित्रपट: धक-धक

  • सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

शबाना आझमी चित्रपट: रॉकी और रानी की प्रेम कहानी

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक

राणी मुखर्जी चित्रपट: मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे

शेफाली शाह चित्रपट: थ्री ऑफ अस

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक

विक्रांत मॅसी चित्रपट: 'ट्वेल्थ फेल'

  • सर्वोत्तम संगीत

अमिताभ भट्टाचार्य तेरे वास्ते, चित्रपट: जरा हटके जरा बचके

  • सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम

'ॲनिमल' - प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बल, अशिम केमसन, हर्षवर्धन रामेश्वर, गुरिंदर सीगल

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक

भूपिंदर बब्बल - अर्जन व्हॅली, चित्रपट: 'ॲनिमल

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक महिला

शिल्पा राव बेशराम रंग, चित्रपट: पठाण

  • सर्वोत्तम कहाणी

अमित राय चित्रपट: ओएमजी 2

  • सर्वोत्कृष्ट पटकथा

विधू विनोद चोप्रा - चित्रपट: 'ट्वेल्थ फेल'

  • सर्वोत्तम संवाद

इशिता मोईत्रा चित्रपट: रॉकी और रानी की प्रेम कहानी

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस सीझन 17' चा विजेता ठरला मुनव्वर फारुकी! काय मिळालं बक्षीस?
  2. अमिताभ बच्चनचा मजेशीर फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो
  3. प्रसिद्ध पॉप स्टार 'डॅनी ली'चं लिपोसक्शन सर्जरीमुळं निधन; का केली जाते ही सर्जरी?
Last Updated : Jan 29, 2024, 3:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details