मुंबई - Fighter Box Office: हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत. असे असले तरी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवण्यासाठी झगडावे लागत आहे. 25 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये सुरू झालेल्या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' चित्रपटाची लाँग वीकेंड संपल्यापासून कमाईत घसरण सुरू झाली आहे. गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी कमाईचा आकडा आणखी खूपच कमी रोहिला.
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मतानुसार, 'फायटर' रिलीज झाल्यापासून आठ दिवसांत भारतात 146 कोटी रुपयांची कमाई करेल असा अंदाज होता. पहिल्या दिवशी या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 22.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 39.5 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 27.5 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 29 कोटी रुपये कमावले. 'फायटर'ने पाचव्या दिवशी भारतात ८ कोटी रुपये, सहाव्या दिवशी ७.५ कोटी आणि सातव्या दिवशी ६.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
8 व्या दिवशी सर्व भाषांमध्ये चित्रपटाने भारतात 5.75 कोटी रुपयांची कमाई करण्याची अपेक्षा आहे. सातव्या दिवसापासून ही जवळपास एक कोटींची घसरण दिसत आहे. चित्रपटाची एकूण देशांतर्गत कमाई सध्या 146.25 कोटी रुपये इतकी आहे. गुरुवारी, एरियल अॅक्शनर असलेल्या या चित्रपटाचा एकूण हिंदी ऑक्युपन्सी रेट 11.33% इतका होता.