महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

देव गिलच्या चाहत्यांनी 75 फुटी पोस्टर बनवून दिल्या 'अहो विक्रमार्का' चित्रपटाला शुभेच्छा - Aho Vikramarka Movie

Aho Vikramaarka : देव गिल अभिनीत 'अहो विक्रमार्का' हा चित्रपट काही दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी चाहत्यांनी देव गिलचं 75 फुटी भव्य पोस्टर बनवलं असून त्याला एक भेट दिली आहे. याशिवाय या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Aho Vikramaarka
अहो विक्रमार्का (instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 6:36 PM IST

मुंबई - Aho Vikramaarka : गेल्या अनेक दिवसांपासून देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत येणाऱ्या 'अहो विक्रमार्का' या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहेत. साऊथ सुपस्टार देव गिल 'अहो विक्रमार्का'च्या निमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये 'अहो विक्रमार्का'बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर त्याच्या चाहत्यांनी देव गिलचं 75 फुटी भव्य पोस्टर बनवलं आहे. आता हे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. देव गिलनं त्याच्या भावना व्यक्त करत म्हटलं, "माझ्या आजवरच्या सर्व भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. चाहत्यांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला आहे. 'अहो विक्रमार्का'ला सुद्धा हा प्रतिसाद मिळेल, असा मला विश्वास आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करेल."

'अहो विक्रमार्का'चा ट्रेलर रिलीज : या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन ,इमोशन्स आणि ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट खूप मनोरंजक असणार आहे. परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या एका धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्याची कहाणी दाखवणाऱ्या 'अहो विक्रमार्का' या चित्रपटात, देव गिल पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. देव गिलनं ट्रेलर लॉन्च प्रसंगी म्हटलं, "हा चित्रपट मी माझ्या आईसाठी बनवला आहे." मूळचा पुण्याच्या असलेल्या देवला मराठी भाषा आणि संस्कृतीचा आदर आहे. मराठीसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशानं 'अहो विक्रमार्का' या भव्य चित्रपटाच्या निर्मितीची धुरा त्यानं सांभाळली आहे. सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, तेजस्विनी पंडित, अनिल नगरकर अशा अनेक मराठी कलाकारांची साथ या चित्रपटासाठी देवला लाभली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्रिकोटी पेटा यांनी केलंय. याशिवाय चित्रपटाची कहाणी प्रसाद वर्मा पेनमत्सा यांनी लिहिली आहे.

'अहो विक्रमार्का' चित्रपट होईल 'या' भाषांमध्ये रिलीज : 'अहो विक्रमार्का' चित्रपटसृष्टीतील पहिला मराठी ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट हा 5 भाषांमध्ये 30 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अभूतपूर्व साहस, जाज्वल्य देशाभिमान दाखवत पोलिसांच्या शौर्याला, खाकी वर्दीतल्या हिरोंना सलाम करणारा 'अहो विक्रमार्का' चित्रपट हा धमाका करण्यासाठी सज्ज आहे. नायक नायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि कुटुंबामधील प्रभावी नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अ‍ॅक्शनचं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला 'अहो विक्रमार्का' हा मल्टीस्टारर चित्रपट पाहण्यासाठी आता अनेकजण आतुर आहेत.

हेही वाचा :

  1. 'बाहुबली'च्या 'कालकेय'ची मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री, वाचा सविस्तर - marathi industry

ABOUT THE AUTHOR

...view details