हैदराबाद : टाटा मोटर्सनं हॅरियर आणि सफारीमध्ये अपडेट केलं आहे. आता नवीन रंग पर्यायांसह नवीन ADAS वैशिष्ट्ये या दोन्ही कारमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या दोन्ही कार BNCAP मध्ये 5 स्टार रेटिंग मिळवणाऱ्या पहिल्या कार आहेत. यात 2.0-लिटर डिझेल इंजिन मिळतंय, जे 170bhp पॉवर जनरेट करतं. टाटा हॅरियरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये आहे आणि टाटा सफारीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 15.49 लाख रुपये आहे.
टाटा हॅरियर रंग पर्याय : हॅरियरचे ॲडव्हेंचर आणि फियरलेस ट्रिम्स आता ॲश ग्रे रंगात उपलब्ध आहेत, जे आधी फक्त स्मार्ट आणि प्युअर ट्रिममध्ये उपलब्ध होते. त्याच वेळी, सीवीड ग्रीन शेड, जी पूर्वी फक्त ॲडव्हेंचर ट्रिममध्ये उपलब्ध होतं, आता टॉप-एंड फियरलेस व्हेरियंटमध्ये देखील समाविष्ट केलं आहे. लोअर ट्रिम्स, स्मार्ट आणि प्युअर, आता कोरल रेड आणि पेबल ग्रे पेंट रंगांसह देखील उपलब्ध असेल, जे पूर्वी फक्त उच्च ट्रिममध्ये उपलब्ध होते. लूनर व्हाईट पेंट योजना आता संपूर्ण हॅरियर मॉडेल लाइनअपमध्ये मानक बनवण्यात आली आहे. सनलिट यलो एक्सटीरियर शेड केवळ टॉप-एंड फियरलेस ट्रिमवर उपलब्ध आहे. एंट्री-लेव्हल स्मार्ट ट्रिम वगळता, ओबेरॉन ब्लॅक कलर इतर तीन ट्रिममध्ये देखील उपलब्ध असेल.
Tata Safari साठी रंग पर्याय : टाटा सफारीसाठी स्मार्ट आणि प्युअर ट्रिम्सला गॅलेक्टिक सॅफायर आणि स्टारडस्ट ॲश रंग मिळतात. हाय ॲडव्हेंचर आणि ॲकम्प्लिश्ड ट्रिम्स आता लुनर स्लेट शेडमध्ये ऑफर केले आहेत. तर सुपरनोव्हा कॉपर कलर टॉप-एंड ॲक्प्लिश्ड ट्रिममध्ये ऑफर केला जातोय. स्टेलर फ्रॉस्ट शेड सर्व प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, तर कॉस्मिक गोल्ड शेड टॉप-एंड ट्रिममध्ये उपलब्ध आहे.
नवीन ADAS वैशिष्ट्ये देखील अद्यतनित केली गेली आहेत. Tata Harrier आणि Safari SUV ला ADAS (Advanced Driver Assistance System) संच लेन सेंटरिंग असिस्ट आणि लेन कीप असिस्ट सारख्या वैशिष्ट्यांसह अद्ययावत करण्यात आलं आहे. यात ADAS, Adventure+ A, Fearless+ आणि Accomplished+ प्रकार उपलब्ध असेल. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सादर केलेल्या हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट्सचे ग्राहक त्यांच्या जवळच्या टाटा डीलरशिपवर कोणत्याही शुल्काशिवाय या अपडेटचा लाभ घेऊ शकतात.
हे वाचलंत का :