महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

करण जोहरची नक्कल केल्यानंतर कॉमेडियन केतन सिंगनं मागितली माफी, एकता कपूरनं केलं समर्थन - Karan johar ekta kapoor - KARAN JOHAR EKTA KAPOOR

Karan johar ekta kapoor : करण जोहरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं स्वत:वर केल्या गेलेल्या विनोदावर नारजी व्यक्त केली आहे. याशिवाय एकता कपूरनं देखील करणला पाठिंबा दिला आहे. तसेच कॉमेडियन केतन सिंगनं देखील याप्रकरणी माफी मागितली आहे.

Karan johar ekta kapoor
करण जोहर एकता कपूर (( Photo courtesy Karan Johar and Ekta Kapoor instagram ))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 12:07 PM IST

मुंबई - Karan johar ekta kapoor : प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. अलीकडील करणच्या पोस्टनं नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं रिॲलिटी शोमध्ये केल्या जाणाऱ्या मिमिक्रीवर नाराजी व्यक्त केली होती. करण जोहर, शाहरुख खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची अनेकदा रिॲलिटी कॉमेडी करून नक्कल केली जाते. अनेकदा सेलेब्स त्याची मिमिक्री केल्यामुळे नाराज होताना दिसतात. आता करणनं त्याच्या पोस्टवर लिहिलं, "मी आईबरोबर बसून टीव्ही पाहत होतो. एका तथाकथित वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या रिॲलिटी शोचा कॉमेडी प्रोमो मी पाहिला. त्या कॉमेडियन माझी खूप वाईट मिमिक्री केली आहे."

करण जोहर एकता कपूर (Ekta Kapoor (Etv Bharat))

करण जोहरनं शेअर केली पोस्ट : पुढं त्यानं लिहिलं, "चेहरा आणि नाव लपवून काहीही बोलणाऱ्या ट्रोलर्सकडून मी हीच अपेक्षा करू शकतो. पण 25 वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीचा भाग असलेल्या व्यक्तीची जेव्हा चेष्टा करणारे काही लोक तुमच्याचं इंडस्ट्रीचे असतात, तेव्हा वाईट वाटते. आता करणची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान चित्रपट निर्माती एकता कपूरनेही तिच्या इंस्टाग्रामवर करणची स्टोरी पोस्ट करत लिहिलं, "असं अनेक वेळा घडले की, रिॲलिटी आणि अवॉर्ड शोमध्ये घाणेरडे विनोद करतात आणि यानंतर तुम्ही या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची अपेक्षा देखील करतात. करण, कृपया त्यांना तुमच्या क्लासिक चित्रपटांपैकी एक नक्कल करण्यास सांगा."

कॉमेडियनने माफी मागितली :कॉमेडियन केतन सिंग हा कॉमेडी शो 'मैडनेस मचाएंगे, इंडिया को हंसाएंगे'मध्ये करण जोहरची नक्कल करताना दिसला. दरम्यान, केतन सिंगनं एका मुलाखतीत या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. केतन सिंगनं करण जोहरची माफी मागितली आहे. त्यानं या मुलाखतीदरम्यान म्हटलं, "मला करण सरांची माफी मागायची आहे, मी त्यांचा शेवटचा रिलीज झालेला 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' हा चित्रपट 5 ते 6 वेळा पाहिला आहे. मी त्यांच्या कामाचा खूप मोठा चाहता आहे, जर मी त्यांना असे करून दुखावले असेल तर माफी मागतो. पण माझा हेतू त्याला दुखावण्याचा नव्हता. मी फक्त प्रेक्षकांना हसवत होतो, मी काहीतरी अतिरिक्त केलं नाही." या कॉमेडी शोच्या निर्मात्यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

वर्कफ्रंट :दरम्यान करण जोहर आणि एकता कपूर या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. दोघांनी मिळून अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. करण आणि एकताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवन आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असणार आहेत. याशिवाय पुढं तो 'द बुल', 'मिस्टर एंड मिसेज माही', 'इंडियन 2', 'जिगरा', 'तख्त', 'बॅड न्यूज' या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. दुसरीकडे एकताच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' आणि 'द साबरमती रिपोर्ट'ची निर्मिती करणार आहे.

हेही वाचा :

  1. डिलीट केलेल्या फोटोवर भाष्य करण्यासाठी सामंथा रुथ प्रभूने शेअर केली 'गूढ पोस्ट' - Samantha Ruth Parbhu
  2. जागतिक हास्य दिन साजरा करण्याची काजोलची खास पद्धत, केला मजेदार व्हिडिओ शेअर - world laughter day
  3. तमन्ना भाटिया स्टारर 'अरनमनाई 4'मधील विजय वर्मानं केलं पोस्टर शेअर - vijay varma share post

ABOUT THE AUTHOR

...view details