मुंबई:दिवाळी हा सण प्रत्येकासाठी विशेष असतो.लक्ष्मीपूजन, फटाके आणि दीपोत्सवाव्यतिरिक्त देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे. दरम्यान संगीत फक्त जुन्या आठवणी जागवत नाही, तर दिवाळीचा आनंदी देखील उत्साहित करते. दिवाळीमध्ये तुम्ही काही सुंदर गाणी घरी वाजवून डान्स करून आपला दिवस चांगला करू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच काही गाणी घेऊन आलो आहोत, जी तुमची दिवाळी आणखी आनंददायी बनवेल.
'मेरे तुम्हारे सबके लिए हैप्पी दिवाली' : 2005 च्या होम डिलिव्हरी आपको... घर तक से है. या चित्रपटामधील 'मेरे तुम्हारे सबके लिए हैप्पी दिवाली' हे सर्वात प्रसिद्ध दिवाळी गाण्यांपैकी एक आहे. वैशाली, सुरथी, दिव्या, सूरज आणि सुनिधी चौहान या गायकांनी गायलेले हे गाणं दिवाळीचा आनंद द्विगुणित करते. सध्या इंस्टाग्राम रील्समध्येही हे गाणं सर्वाधिक वापरले जात आहे. या दिवाळीमध्ये तुम्ही देखील या गाण्यावर रिल तयार करू शकता.
दीप दिवाली के झूठे :1960च्या 'जुगनू' चित्रपटातील एक सदाबहार क्लासिक, 'दीप दिवाळी के झुटे' एक उत्तम दिवाळीसाठी गाणं आहे. हे गाणं आजच्या दिवशी वाजवून तुम्ही दिवाळी साजरी करू शकता.