हैदराबाद :तेलंगणा सरकारनं पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझला कॉन्सर्ट आता नोटीस पाठवली आहे. दिलजीतचा दिल लुमिनाटी कॉन्सर्ट शुक्रवारी हैदराबादमध्ये होणार आहे. शुक्रवारी हैदराबादमध्ये त्याच्या दिल-लुमिनाटी कॉन्सर्टच्या आधी ही नोटीस आल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये आता चिंता व्यक्ती केली जात आहे. दरम्यान या नोटीसमध्ये अल्कोहोल, ड्रग्स आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी गाणी न गाण्याचे निर्देश दिले आहेत. चंदीगडमधील एका रहिवाशाच्या तक्रारीनंतर ही नोटीस देण्यात आली आहे. याशिवाय दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये किशोरवयीन मुलांचा एंट्री न देण्याचे देखील निर्देश दिले आहेत. तेलंगणाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या आयुक्त कांथी वेस्ले यांनी दिलजीत दोसांझ आणि इव्हेंट आयोजक दोघांनाही इशारा दिला आहे.
तेलंगणा सरकारनं दिलजीत दोसांझला पाठवली नोटीस :गेल्या महिन्यात, दिलजीत दोसांझनं नवी दिल्लीतील लाइव्ह शोमध्ये अल्कोहोल, ड्रग्स आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी गाणी गायल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर त्याला अनेक यूजर्सनं ट्रोल केलं होतं. आता पुन्हा हैदराबादमध्ये हेच चित्रपट पाहायला मिळेल, त्यामुळे आधीच या सर्व गोष्टींवर लक्ष देण्यात आलं आहे. दिलजीत हैदराबादला पोहोचला असून त्यानं 14 नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक चारमीनारला भेट दिली. याशिवाय त्यानं मंदिर आणि गुरुद्वारामध्ये प्रार्थना केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला. त्यानं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे.