मुंबई - Dia Mirza Vaibhav Anniversary: अभिनेत्री दिया मिर्झा हिच्यासाठी आज 15 फेब्रुवारी हा दिवस खूप खास आहे. आज दिया तिच्या दुसऱ्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहे. दियानं 2021 मध्ये वैभव रेखीशी लग्न केले. याआधी तिनं 2014 मध्ये साहिल संघाबरोबर लग्न केले आणि 2019 मध्ये पाच वर्षांनी त्यांच नात तुटलं. पहिल्या लग्नाच्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी दियानं दुसरे लग्न केलं. आज, 15 फेब्रुवारी रोजी, दियानं पती वैभवला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे तिच्या चाहत्यांनी आजवर न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.
दियाची भावनिक पोस्ट :तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिनं एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, ''या दिवशी आम्ही खूप रडलो, आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू, आम्ही आमच्या सुखात आणि दु:खामध्ये एकमेकांबरोबर होतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी'' दियाच्या या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देऊन तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याशिवाय बिपाशा बसू, फरदीन खान आणि संध्या मृदुल यांनी तिला तिच्या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिया मिर्झाला या लग्नापासून दोन मुले आहेत, ज्यांच्याबरोबर दिया अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. याशिवाय ती आपल्या चाहत्यासोबत अनेकदा इंस्टा लाईव्ह करून संवाद साधत असते. दियाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे, तिचे इंस्टाग्रामवर 5.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.