महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'धूम 4'ला मिळाला नवा दिग्दर्शक, रणबीर कपूरबरोबर जमणार पुन्हा जोडी - Dhoom 4 update - DHOOM 4 UPDATE

Dhoom 4 update : यशराज बॅनरच्या वतीनं सुपरहिट 'धूम' चित्रपटाची मालिका पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे. अभिनेता रणबीर कपूरला घेऊन 'धूम 4' हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करणार असल्याची सध्या चर्चा आहे. तो सध्या हृतिक रोशनबरोबर 'वॉर 2' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. एवढेच नाही तर दिग्दर्शक रणबीर कपूरबरोबर 'ब्रम्हास्त्र' हा एक ब्लॉकबस्टर चित्रपटही दिला आहे.

Dhoom 4
'धूम 4' ('धूम 4' (Movie Poster/ETV Bharat))

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2024, 2:16 PM IST

मुंबई - यशराज फिल्म्स निर्मित 'धूम' या सुपरहिट फ्रँचायझीच्या नव्या भागाची प्रतीक्षा गेली 11 वर्षे प्रेक्षक करत आहेत. 'धूम 3' प्रदर्शित होऊन एक दशक उलटल्यानंतरही नवी अपडेट मिळत नसल्यानं चाहते नाराज झाले होते. अशा वेळी 'धूम 4' मध्ये रणबीर कपूर खलनायकाची भूमिका साकारणार ही बातमी त्याच्या वाढदिवसानिमित्त आल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आणि त्याचवेळी 'धूम 4' येत असल्याचं समाधानही यशराज बॅनरच्या सुपरहिट फ्रँचायझीच्या चाहत्यांनी व्यक्त केलं.

आता 'धूम 4' या कथित चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. अयान मुखर्जी 'धूम ४' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. अयान आणि रणबीरनं यांनी 'ब्रह्मास्त्र' हा सुपरहिट चित्रपट एकत्र केला होता. सध्या, अयान मुखर्जी 'वॉर 2' हा चित्रपट बनवत आहे, ज्यामध्ये हृतिक रोशन, जूनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

सध्या समजत असलेल्या माहितीनुसार 'धूम 4' ची कमानही अयान मुखर्जीकडे देण्यात आली आहे. याआधी अयानला सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'वॉर' या चित्रपटाचा सिक्वेल सोपवण्यात आला आहे. 'धूम 4' मध्ये रणबीर कपूर खलनायक असेल आणि अयान मुखर्जी याचे दिग्दर्शन करणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटासाठी नायकाचा शोध सुरू असल्याचंही बोललं जात आहे. 'धूम'चे प्रेक्षक दशकभरापासून 'धूम 4' ची वाट पाहत आहेत, पण 'वॉर 2' या चित्रपटानंतरच 'धूम 4' ची अधिकृत घोषणा होऊ शकते, असेही बोललं जात आहे. 'धूम 4' वर निर्मात्यांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही.

'धूम' या चित्रपटाचा पहिला भाग 27 ऑगस्ट 2004 रोजी रिलीज झाला होता. 'धूम 2' चा सिक्वेल 2006 मध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला होता आणि 'धूम 3' 2013 मध्ये रिलीज झाला होता. जॉन अब्राहमने 'धूम'मध्ये खलनायकाची, 'धूम 2' मध्ये हृतिक रोशन आणि 'धूम 3' मध्ये आमिर खानने खलनायकाची भूमिका साकारली होती. 'धूम' मालिका बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली आणि चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details