मुंबई - Deepika Padukone :साऊथ सुपरस्टार प्रभास स्टारर बहुप्रतीक्षित 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचा ट्रेलर बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. 'कल्की 2898 एडी'च ट्रेलर 10 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता रिलीज झाला. 'कल्की 2898 एडी'च्या ट्रेलरला खूप प्रेम मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बेबी बंप पाहायला मिळत आहे. दीपिका या वर्षी आई होणार आहे. दरम्यान 'कल्की 2898 एडी'च्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटामधील दीपिकाचा बेबी बंप पाहून चाहते अंदाज लावत आहे की, ती कल्कीला जन्म देईल. ट्रेलरमध्ये दीपिका पदुकोण प्रेग्नंट असल्याचं दाखविण्यात आलं आहे.
'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर धमाकेदार :दीपिका पदुकोणच्या पोटात वाढणारे मूल हे देवाचे रूप आहे, असं अमिताभ बच्चन ट्रेलरमध्ये अश्वत्माच्या भूमिकेत सांगत आहेत. दीपिका पदुकोणचे हे मूल कल्कीच्या रूपात जन्माला येईल, जे शत्रूंशी लढून मानवजातीला वाचवेल. ट्रेलरमध्ये दिशा पटानी प्रभासला भैरव नावानं हाक मारताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये दीपिकाचं नाव सुम एटी असल्याचं दिसत आहे. ट्रेलरवरून कळते की कलयुग संपल्यानंतर, ज्याच्या पोटी कल्की जन्मेल ती सुमती असेल. दरम्यान सोशल मीडियावर 'कल्की 2898 एडी' चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहेत.