मुंबई - Will Smith :बॉलिवूड स्टार कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण नुकतेच पालक झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 सप्टेंबर रोजी दीपिकानं एका गोंडस कन्येला जन्म दिला आहे. दीपवीरच्या घरी लक्ष्मीचं आगमन झाल्यानं संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. अनेकजण या जोडप्याला अभिनंदनाचे संदेश पाठवताना दिसत आहेत. आता अमेरिकन हॉलिवूड अभिनेता विल स्मिथनेही रणवीर आणि दीपिकाचं पालक बनल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. विल स्मिथनं दीपवीरच्या गुड न्यूज पोस्टवर अभिनंदन करताना, 'ममा आणि पापा यांचं अभिनंदन' अशा आशयाची पोस्ट केली आहे.
विल स्मिथ हा रणवीरचा मित्र :विल स्मिथचा अभिनंदनाचा संदेश सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे. रणवीर आणि विल हे मित्र आहेत. 2018 मध्ये, विलनं करण जोहरबरोबरचे फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये विलबरोबर रणवीरदेखील दिसत होता. विलनं या पोस्टला कॅप्शन लिहिलं होतं, 'बॉलिवुडमधील दोन सर्वोत्तम व्यक्ती करण जोहर आणि रणवीर सिंगकडून शिकत आहे.' यानंतर विल आणि रणवीर सिंग यांच्यात चांगली मैत्री असल्याचं समजलं होतं. 2019 मध्ये रिलीज झालेला 'गली बॉय' चित्रपट पाहून विलनं रणवीरचं खूप कौतुक केलं होतं. रणवीरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.