मुंबई : 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्डप्लेचे प्रसिद्ध गायक क्रिस मार्टिननं अहमदाबादमधील संगीत कार्यक्रमाद्वारे भारताला एक सुंदर भेट दिली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यानं 'वंदे मातरम्' आणि 'माँ तुझे सलाम' हे गाणं गायली. त्याच्या या सादरीकरणानं तिथे उपस्थित असलेले संपूर्ण प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. यावेळी चाहत्यांनी मोठ्यानं जयजयकार आणि टाळ्यांचा वर्षाव केला. रविवार, 26 जानेवारी रोजी, क्रिस मार्टिन आणि त्याच्या बॅन्डमेट्सनी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक अद्भुत सादरीकरण केलं. या कॉन्सर्टदरम्यान, क्रिसनं असं काही केलं, त्यामुळे आता तो चर्चेत आला आहे. आता सोशल मीडियावर त्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
गायक क्रिस मार्टिननं भारतीयांबरोबर प्रजासत्ताक दिन केला साजरा, क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहचं केलं कौतुक - REPUBLIC DAY 2025
क्रिस मार्टिननं प्रजासत्ताक दिन अहमदाबादमध्ये भारतीयांबरोबर साजरा केला. कॉन्सर्टदरम्यान त्यानं भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहचं कौतुक करून काही विशेष गाणी गायली.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Jan 27, 2025, 10:32 AM IST
क्रिस मार्टिननं भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहचं केलं कौतुक :क्रिस मार्टिननं 'भारत माता को सलाम' या गाण्यानं कॉन्सर्टचा समारोप केला. यानंतर त्यानं सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमादरम्यान आणखी एका खास क्षणी, ख्रिसनं भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहला एक सुंदर गाणं समर्पित केलं. मार्टिननं गमतीनं कबूल केलं की बुमराहनं त्याच्या वेगवान गोलंदाजीनं इंग्लिश फलंदाजीची लाइनअप नाश करून टाकण्याची पद्धत त्याला आवडली नाही. डिस्ने+ हॉटस्टार इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोल्डप्लेचा फ्रंटमन क्रिस गाण्यात "ओ जसप्रीत बुमराह, माझा सुंदर भाऊ..." असं गातो.
क्रिस मार्टिननं मुंबई कॉन्सर्टदरम्यान 'या' सुपरस्टारचं मानलं होतं आभार : रविवारचा शो डिस्ने+ हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात आला आहे. क्रिस मार्टिननं त्याच्या चाहत्यांबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त कॉन्सर्टदरम्यान केलं. यापूर्वी, भारतीय गायिका जसलीन रॉयलनं कोल्डप्लेचा फ्रंटमन क्रिस मार्टिनबरोबर बॅन्डच्या नवीन अल्बम मून म्युझिकमधील 'वी प्रे' या सुंदर ट्रॅकसाठी सहकार्य केलं होतं. तसेच यापूर्वी मुंबईत झालेल्या क्रिस मार्टिनच्या कॉन्सर्टदरम्यान त्यानं शाहरुख खानचं देखील आभार मानलं होतं. कोल्डप्लेच्या भारत दौऱ्यात 19 आणि 21 जानेवारी रोजी मुंबईत सादरीकरण झालं होतं, त्यानंतर 25 आणि 26 जानेवारी रोजी अहमदाबादमध्ये दोन कार्यक्रम झाले.