महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

"यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही"; अभिनेता चिन्मय मांडलेकरनं का घेतला हा निर्णय? - Chinmay Mandalekar - CHINMAY MANDALEKAR

Chinmay Mandalekar : अभिनेता चिन्मय मांडलेकर यानं यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतलाय. मुलाच्या नावावरून चिन्मय मांडलेकरला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. चिन्मयला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. त्यानंतर त्यानं हा मोठा निर्णय घेतला.

Chinmay Mandalekar
Chinmay Mandalekar

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 9:07 PM IST

मुंबई Chinmay Mandalekar :मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या वेगळ्याच कारणामुळं ट्रोल होत आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं एका पॉडकास्टला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत चिन्मयच्या मुलाचा विषय निघाला. चिन्मय मांडलेकर याच्या मुलाचं नाव‘जहांगीर’ आहे. यावरून नेटकऱ्यांनी चिन्मयला प्रचंड ट्रोल केलं. मानसिक त्रास नको, म्हणून चिन्मय मांडलेकरनं मोठा निर्णय घेतलाय.

मांडलेकर कुटुंबाचा संताप :मागील काही दिवसांपासून चिन्मय मांडलेकरसह त्याच्या कुटुंबाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. चिन्मयच्या मुलाच्या नावावरुन नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलिंग केलंय. चिन्मयची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर हिनं देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत तिनं देखील आपला संताप व्यक्त केला. नेहानं व्हिडिओ शेअर केल्यानंतर आता चिन्मयनं देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला. चिन्मय म्हणाला की, "तुम्ही मला माझ्या कामावरून वाटेल ते बोला. मी ऐकून घ्यायला तयार आहे. मात्र, चुकीचा विषय घेऊन माझ्या कुटुंबावर आणि चारित्र्यावर बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही."

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही : अनेकांना विविध कारणांमुळं नेटकरी ट्रोल करत असतात. सेलिब्रिटी लोकांना ट्रोलिंगचा जास्ती प्रमाणात सामना करावा लागतो. चिन्मय मांडलेकरबाबतीतही असंच झालंय. "चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सकारातो आणि मुलाचं नाव जहांगीर का ठेवतो?" असं म्हणत अनेकांनी चिन्मयला ट्रोल केलं. "यापुढं मी कोणत्याही चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही," असा निर्णय चिन्मय मांडलेकरनं जाहीर केलाय.

चिन्मयची पोस्ट :"नमस्कार माझं नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायानं मी एक अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. माझी पत्नी नेहानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. माझ्या मुलाच्या जहांगीर या नावावरून आम्हाला होणारं ट्रोलिंग आणि त्याच्या नावावरून आमच्या कुटुंबाबद्दल केल्या जाणाऱ्या घाणेरड्या कमेंट्सबाबतचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतरसुद्धा ट्रोलिंग कमी झालं नाही. नेटकरी मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागले. याचा मला खूप त्रास होतो. माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता. तुम्हाला ते आवडलं, नाही आवडलं ते तुम्ही प्रत्यक्षात भेटून किंवा सोशल मीडियावरही सांगू शकता. पण, माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे, असं मला वाटत नाही."

जहांगीर नावाचा वाद :"माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे हे खटकतंय; मग ‘जहांगीर आर्ट गॅलरी’चं नाव बदलणार का? जहांगीर नावाच्याच माणसाला आपल्या देशानं ‘भारतरत्न’ दिलाय. भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभाई टाटा -जेआरडी टाटा. त्या जेआरडी टाटांनी उभी केलेली ‘एअर इंडिया’; ज्याच्यातून आपण अभिमानानं प्रवास करतो आणि त्यांनी उभ्या केलेल्या अनेक उद्योगांचा फायदा भारतातील प्रत्येक नागरिकाला होतो, त्यांचा वापर करताना आपण हा विचार करतो का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

हे वाचवलंत का :

  1. 'किसकी मजाल है मुझे...' खूबसूरत तस्वीरें शेयर कर श्रद्धा कपूर ने दिया ये चैलेंज, फैंस के आए फनी रिएक्शन - Shraddha Kapoor
  2. मीरा राजपूत ने दिखाई वरुण धवन की वाइफ के बेबी शॉवर की झलक, तस्वीर शेयर कर कपल को दी स्पेशल बधाई - MIRA RAJPUT NATASHA DALAL
  3. KKR Vs RCB Match: बिजी शेड्यूल के बीच अनन्या ने पूरा कर रहीं वादा, केकेआर के लिए खास अंदाज में किया चीयर - Ananya Panday

ABOUT THE AUTHOR

...view details