मुंबई - दिवाळी सण जवळ येताच बॉलिवूडमध्ये वेध लागतात ते ड्रेस डिझानर मनिष मल्होत्राच्या पार्टीचे. तमाम तारे तारकांची मांदियाळीच या निमित्तानं पाहायला मिळते. यंदाचंही वर्ष याला अपवाद नव्हतं. या तारांकित पार्टीला अनन्या पांडे, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, नेहा धुपिया, अंगद बेदी, सुहाना खान, गौरी खान, क्रिती सेनन, श्रिया सरन, हुमा कुरेशी, आलिया एफ, आलिया भट्ट, रेखा, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर, ताहिरा कश्यप, अपारशक्ती खुराना, शिल्पा शेट्टी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी भाग घेतला होता.
शिल्पा शेट्टी (( Photo ANI )) अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं आपल्या नेहमीच्या ग्लॅमरस लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ती बहीण शमिता शेट्टीसोबत पार्टीत सहभागी झाली होती.
शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी (( Photo ANI )) अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या स्टाईलमध्ये साडीमध्ये हजर राहिली होती.
जान्हवी कपूर (( Photo ANI )) अलीकडेच 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' आणि 'क्रू'मध्ये दिसलेली क्रिती सेनॉन पिवळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती.
क्रिती सेनॉन (( Photo ANI )) अभिनेता अर्जुन कपूरही या दिवाळीच्या खास कार्यक्रमाला उपस्थित होता.
अर्जुन कपूर (( Photo ANI )) या पार्टीत अभिनेत्री रवीना टंडनने हजेरी लावत सर्वांना आपलंसं केलं.
श्रद्धा कपूरनं तिच्या साधेपणानं आणि छान लूकसह हजेरी लावली होती.
श्रद्धा कपूर (( Photo ANI )) ज्येष्ठ कलाकार रेखा आणि शबाना आझमी यांनी मनिष मल्होत्राच्या दिवाळीच्या पार्टीत एकत्र पोझ दिली. यातील फोटोत अभिनेत्री रेखा शबाना आझमीच्या गालावर किस करताना दिसत आहे.
शबाना आणि रेखा (( Photo ANI )) यावेळी अनन्या पांडे चमचमत्या नाईटमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली होती.
मनिषसह शबाना आणि रेखा (( Photo ANI )) 'भूल भुलैया 3' या त्याच्या आगामी प्रोजेक्टची तयारी करत असलेला कार्तिक आर्यन देखील सेलेब्रिटींच्या उपस्थितांमध्ये होता.
अनन्या पांडे (( Photo ANI )) शर्वरी वाघ, काजोल, शाहिद कपूर, मीरा राजपूत, शोभिता धुलिपाला आणि इतर अनेकांसह इतर अनेक सेलिब्रिटींनी दिवाळीच्या पार्टीत सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीने या भव्य सोहळ्यात सौंदर्य आणि ग्लॅमरची भर पडली.