महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ईशान खट्टरच्या बर्थडेला भाऊ शाहिद कपूरनं बनवला केक, 'मीरा भाभी'च्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे - ISHAAN KHATTAR BIRTHDAY

Ishaan Khattar birthday ईशान खट्टरच्या 29 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचा भाऊ शाहिद कपूरनं केक बनवला होता. हा केक कापतानाच्या फोटोतील मीरा राजपूतचे भाव पाहण्यासारखे आहेत.

Ishaan Khattar birthday
ईशान खट्टर वाढदिवस (Ishaan Khattar Instagram Photo Post / ANI)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 1, 2024, 5:17 PM IST

मुंबई - अभिनेता ईशान खट्टर आज 1 नोव्हेंबर त्याचा वाढदिवस, साजरा करत आहे. या खास दिवशी त्यानं त्याचा भाऊ शाहिद कपूर आणि वहिणी मीरा राजपूत यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत तो आपल्या भावाला केक खाऊ घालताना दिसत आहे. या फोटोत मीरा राजपूतच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.

ईशान खट्टर वाढदिवस (Ishaan Khattar Instagram Photo Post / ANI)

या फोटोच्या कॅप्शनमध्ये ईशाननं लिहिलंय, "दिवाळीला वाढदिवस असणं म्हणजे तीन केक. यातील दोन केक माझ्या 8 वर्षाच्या पुतणीनं बनवले आहेत आणि एक माझ्या येड्या भावानं."

कामाच्या आघाडीवर, इशान खट्टरला 'द परफेक्ट कपल' या मालिकेतील शूटरच्या भूमिकेसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. याबद्दल त्यानं प्रेक्षकांचं आभार मानलं होतं. 'द परफेक्ट कपल'मध्ये, खट्टरने शूटर डिवलची भूमिका साकारली आहे. या मालिकेत त्याच्यासह निकोल किडमन, डकोटा फॅनिंग, इव्ह ह्यूसन, बिली हाऊल, जॅक रेनॉर, इशान खट्टर, लिव्ह श्रेबर आणि इसाबेल अदजानी यांच्याही भूमिका आहेत. ही मालिका एलिन हिल्डरब्रँडच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या कादंबरीवर आधारित आहे.

ईशान खट्टर आणि चांदनी बेंझ डेटिंग चर्चा - ईशानच्या कामाच्या आघाडीवरील अपडेट 'द परफेक्ट कपल' पुरतंच सध्यातरी मर्यादित असलं तरी तो मॉडेल चांदनी बेंझ हिच्या बरोबर परफेक्ट कपल बनण्याची तयारी करत आहे. ईशान खट्टर आणि चांदनी अनेकदा डेटिंग करत असताना दिसले आहे. त्याच्या वाढदिवसाच्या अगोदर हे जोडपं मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये एकत्र आलेलं दिसलं. या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्यांदाच लोकांच्या नजरेत आलेली ही जोडी विविध कार्यक्रमांमध्ये अनेकवेळा दिसली आहे.

इशान खट्टरनं 2005 मध्ये 'वाह, लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'उडता पंजाब', 'हाफ विडो'सारख्या चित्रपटातून तो झळकला परंतु 'बियॉन्ड द क्लाउड्स' या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. 'खाली पीली', 'फोन भूत' आणि 'पिप्पा' सारख्या चित्रपटामुळेही तो प्रसिद्धीस आला. पण 'धडक' या चित्रपटात त्याची जान्हवी कपूरबरोबर जमलेली जोडी खूप चर्चेचा विषय ठरली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details