महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'मुळे अमेरिकेत खळबळ उडाली, प्री-सेलमध्ये रचला इतिहास... - ALLU ARJUN

'पुष्पा 2' रिलीजपूर्वी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवत आहे. अल्लू अर्जुन स्टारर हा चित्रपट 'यूएसए'मध्ये जलद गतीनं प्री-सेलिंग करत आहे.

Pushpa 2
पुष्पा 2 ('पुष्पा 2' पोस्टर (@agsentertainment Instagram))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 19, 2024, 2:15 PM IST

मुंबई :अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर आगामी ॲक्शन ड्रामा 'पुष्पा 2 द रुल' हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. गेल्या रविवारी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज करून निर्मात्यांनी चाहत्यांना थक्क केलं होतं. ट्रेलर पाहून अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हणत आहेत. दरम्यान 'पुष्पा 2'च्या आगाऊ बुकिंगबद्दल बोलायचं झालं तर, यूएसएमध्ये चित्रपटाची तिकिटे खूप वेगाममध्ये विकली जात आहेत. निर्मात्यांनी आज, 19 नोव्हेंबर रोजी 'पुष्पा 2'च्या आगाऊ बुकिंगबद्दल अपडेट शेअर केली आहे.

'पुष्पा 2 द रुल'नं रचला मोठा इतिहास :सोशल मीडियावर चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करत निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'पुष्पाराज'चा दबदबा बॉक्स ऑफिसला नवीन परिमाण परिभाषित करत आहे. आणखी एक दिवस,आणखी एक विक्रम आणि इतिहासाच्या पानांमध्ये आणखी एक कामगिरी नोंदवली गेली. यूएस बॉक्स ऑफिसवर 1 दशलक्ष पेक्षा जास्त प्री-सेल्स गाठणारा सर्वात जलद भारतीय चित्रपट 'पुष्पा 2' बनला आहे.' निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये 'पुष्पा राज' नोटांच्या पहाडवर बसलेला दिसत आहे. 'पुष्पा 2 द रुल'नं एक रेकॉर्ड तोडला आहे. या चित्रपटानं 750 हजारांहून अधिक यूएसए प्रीमियर प्री-सेल्स आणि 27 हजारांहून अधिक तिकिटे विकली आहे. आता हा चित्रपट 1 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त प्री-सेल करणारा सर्वात वेगवान भारतीय चित्रपट म्हणून उदयास आला आहे.

ट्रेलरला चाहत्यांची पसंती :17 नोव्हेंबर रोजी निर्मात्यांनी 'पुष्पा 2'चा पाटणा येथे ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाचे आयोजन केला होता. प्री-सेलिंगबरोबर चित्रपटाच्या ट्रेलरनेही आता एक इतिहास रचला आहे. 'पुष्पा 2'च्या ट्रेलरला 24 तासांत 40 दशलक्ष व्ह्यूज मिळाले असून हा मोठा विक्रम आहे. याशिवाय या चित्रपटाच्या ट्रेलरला आतापर्यत 100 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळले आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला यूट्यूबवर 2.3 दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2 द रुल'मध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा :

  1. एसएस राजामौली यांनी 'पुष्पा 2'च्या ट्रेलरचं केलं कौतुक, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी अल्लू अर्जुनला केली पार्टीची मागणी
  2. 'पुष्पा 2' ट्रेलरने रचला इतिहास, पहिल्या 24 तासात 40 दशलक्ष व्ह्यूज, 'आरआरआर' ते 'सालार'चेही मोडले रेकॉर्ड
  3. 'पुष्पा 2'चा ट्रेलर पाहून चाहते रिलीजसाठी आतुर, अल्लू अर्जुन मोठ्या पडद्यावर 'वाइल्ड फायर'च्या रुपात करेल धमाका...

ABOUT THE AUTHOR

...view details