महाराष्ट्र

maharashtra

बॉलिवूड गायक सोनू निगम केदारनाथ धामला पोहोचला, फोटो व्हायरल - singer sonu nigam

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 2:07 PM IST

Singer Sonu Nigam : प्रसिद्ध बॉलिवूड गायक सोनू निगम केदारनाथ धामच्या यात्रेसाठी दाखला झाला होता. त्याचं या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आलं होतं.

Singer Sonu Nigam
singer sonu nigam ((फोटो-ईटीवी भारत))

रुद्रप्रयाग (उत्तराखंड) - Singer Sonu Nigam :प्रसिद्ध बॉलिवूड गायक सोनू निगमनं आज सकाळी केदारनाथाचं दर्शन घेतलं. तो सकाळी 7.15 वाजता हेलिकॉप्टरनं केदारनाथ धामला पोहोचला. हेलिपॅडवर मोठ्या संख्येनं यात्रेकरू आणि त्याचे चाहते त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्याशी बोलण्यासाठी उत्सुक होते. यानंतर काही चाहत्यांनी त्याच्याबरोबर फोटो काढले. हेलिपॅडवर मंदिर समिती व तीर्थ पुरोहित समाजानं यावेळी त्यांचं जोरदार स्वागत केलं. सोनू निगमबरोबर त्याच्या कुटुंबातील सदस्यही केदारनाथच्या दर्शनाला पोहोचले होते. यानंतर हेलिपॅडवरून पायी चालत केदारनाथ मंदिरात आल्यानंतर त्यानं बाहेरून नमन केलं.

सोनू निगम केदारनाथ धामला पोहचला : त्यानंतर त्यांनी प्रवाशांसह मंदिरात प्रवेश करून शंकराची पूजा केली. यावेळी त्यानं जलाभिषेक केला. मंदिराच्या प्रांगणात, मंदिर समितीचे प्रभारी अधिकारी आणि कार्यकारी अभियंता अनिल ध्यानी यांनी बॉलिवूड गायक सोनू निगम याचं स्वागत केलं. यानंतर त्याला केदारनाथचा प्रसाद देखील दिला. सोनू निगम केदारनाथ मंदिरात गेल्यानंतर भारावून गेला होता. जेव्हा त्याला विचारले गेले की, तो अचानक केदारनाथच्या दर्शनासाठी कसा आला. यावर त्यानं उत्तर दिलं "संदेश येतात हे समजून घेतलं पाहिजे, मला केदारनाथ यांच बोलवण आलं होतं. मी सदैव देवाचा ऋणी राहिन."

सोनू निगमचं करण्यात आलं भव्य स्वागत :सोनू निगमच्या संघर्षाचे चांगले-वाईट दिवस आणि मुंबईमध्ये त्याला साथ देणाऱ्या सहकाऱ्यांची आठवण त्याला नेहमीच असते, असं त्यानं सांगितलं. तो वडिलांबरोबर लग्नात गाणं गात होता. दरम्यान 'बॉर्डर' चित्रपटातील 'संदेश आते है हमे तडपत्ते हैं जो चिठ्ठी आती है पूछे जाती की घर कब आओगे' हे गाणं गाऊन सोनू निगमनं प्रसिद्धी मिळवली होती. आज 27 वर्षांनंतरही हे गाणं लोकप्रिय आहे. सोनूनं अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्याला देवीच्या जागरण आणि भजनामुळे प्रसिद्धी मिळाली होती. सोनू निगम जेव्हा मंदिरात आला, तेव्हा प्रभारी अधिकारी कार्यकारी अभियंता अनिल ध्यानी यांच्यासह पुजारी शिवशंकर लिंग आणि केदार सभेचे अध्यक्ष राजकुमार तिवारी असेही काहीजण उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. प्रिन्स नरुला आणि युविका चौधरीच्या घरी होईल छोट्या पाहूण्याचं आगमन, केली पोस्ट शेअर - yuvika chaudhary pregnancy
  2. WATCH: बाप रे! 500 फीट की ड्रेस, पेरिस फैशन वीक में इस सिंगर की 'नेवर-एंडिंग' ड्रेस देख शॉक्ड हुए लोग - Katy Perry
  3. प्रिन्स नरुला आणि युविका चौधरीच्या घरी होईल छोट्या पाहूण्याचं आगमन, केली पोस्ट शेअर - yuvika chaudhary pregnancy

ABOUT THE AUTHOR

...view details