मुंबई - हिंदी सिनेजगतात अफेअर, प्रेम, लग्नं, वाद आणि नंतर घटस्फोट अशा बातम्या आता नेहमीचेच झाल्या आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांसारख्या स्टार कपल्सच्या विभक्त होण्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. दरम्यान, अभिषेक बच्चनचे नाव त्याची सह-अभिनेत्री निम्रत कौर बरोबरही जोडलं जात आहे. अशा परिस्थितीत आपण त्या स्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरी पत्नी घरी आणली होती.
सनी देओलचे वडील
हिंदी चित्रपटसृष्टीतील ही-मॅन धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर (सनी देओल-बॉबी देओल यांची आई) यांच्याशी विवाह केला होता. त्याकाळातील अनेक आघाडीच्या अभिनेत्री धर्मेंद्र यांच्यावर मोहित झाल्या होत्या. त्याचवेळी धर्मेंद्र यांचे हृदय हिंदी सिनेसृष्टीतील ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्यावर चिकटलं होतं. धर्मेंद्र आणि हेमा यांनी दुसरा धर्म स्वीकारल्यानंतर 1980 मध्ये लग्न केलं होतं.
प्रतीक बब्बरचे वडील
हिंदी चित्रपटसृष्टीत वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता राज बब्बर याचाही घटस्फोटाशिवाय दुसरं लग्न करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत समावेश होतो. राज बब्बरच्या पहिल्या पत्नीचे नाव नादिरा आहे, परंतु विवाहित असूनही राज बब्बरनं अभिनेत्री स्मिता पाटीलला आपली दुसरी पत्नी बनवलं. नादिरा यांनी घटस्फोटाला नकार दिल्यानं राज बब्बर यांनी 1983 मध्ये स्मिता पाटील यांच्याशी लग्न केलं होतं, परंतु स्मिता यांच्यावर काळानं ढडप घातली आणि 1986 मध्ये स्मिता यांचं निधन झालं.
हृतिक रोशनचे माजी सासरे
हृतिक रोशनचे माजी सासरे आणि अभिनेता संजय खान यांनीही घटस्फोटाशिवाय दोनदा लग्न केलं होतं. संजयच्या पहिल्या पत्नीचं नाव जरीन कात्रक आहे, तिच्याशी संजयनं 1966 मध्ये लग्न केले. यानंतर संजय ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमानच्या जवळ आला आणि 1978 मध्ये लग्न केले. मात्र, हे लग्न अवघ्या एका वर्षानंतर तुटले.
आलियाचे वडील
आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांचाही दोनदा लग्न करणाऱ्या स्टार्सच्या यादीत समावेश आहे. महेशची पहिली पत्नी किरण आहे, जिच्यापासून त्यांना पूजा भट्ट ही मुलगी झाली. त्याचवेळी महेश भट्ट यांचे नाव परवीन बाबीशी जोडलं गेलं, पण हे नातं फार काळ टिकलं नाही. यानंतर महेश भट्ट यांनी 1986 मध्ये अभिनेत्री सोनी राजदानशी लग्न केलं. या लग्नापासून महेश भट्ट यांना आलिया भट्ट ही मुलगी झाली.
सलमान खानचे वडील
ऐश्वर्या रायचा माजी प्रियकर आणि बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचे पटकथा लेखक वडील सलीम खान यांचाही समावेश आहे. त्यांनी पत्नीला घटस्फोट न घेता दुसरे लग्न केलं. सलीम खानचे पहिले लग्न सुशीला चरक (1964) यांच्याशी झालं होतं आणि 1981 मध्ये सलीम खान यांनी हिंदी सिनेमात आयटम साँग करणाऱ्या डान्सर हेलनला आपली वधू बनवलं होतं. विशेष म्हणजे सलीम खानने दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीची परवानगी घेतली होती.
या गायकाने दुसरे लग्नही केले
बॉलीवूडला एक गोड गाणे देणारा उत्तम गायक उदित नारायण यांचाही या यादीत समावेश आहे. उदित नारायण यांनी 1984 मध्ये रंजना झा यांच्याशी पहिलं लग्न केलं आणि घटस्फोटाशिवाय दीपा (1986) यांच्याशी दुसरं लग्न केलं. कायदेशीर कारवाईनंतर उदित नारायण यांनी त्यांची पहिली पत्नी रंजनाला दुसरी पत्नी दीपा हिला एकत्र ठेवण्यास तयार केलं.