महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दिया मिर्झानं तिचा 43वा वाढदिवस केला लेक सिटी उदयपूरमध्ये साजरा, पाहा फोटो.... - DIA MIRZA BIRTHDAY

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झानं आपला 43वा वाढदिवस उदयपूरमध्ये कुटुंबाबरोबर साजरा केला. आता तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

dia mirza
दिया मिर्झा (अभिनेत्री दिया मिर्झा कुटुंबासह (ईटीव्ही भारत))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 18, 2024, 2:25 PM IST

मुंबई : देश आणि जगात आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले लेकसिटी आता बॉलिवूड स्टार्सची पहिली पसंती बनली आहे. यामुळेच त्यांना लग्न आणि वाढदिवस साजरा करायचा असेल तर अनेक स्टार्स थेट इथे जातात. दरम्यान, 'रेहना है तेरे दिल में' फेम दिया मिर्झानं तिचा 43वा वाढदिवस उदयपूरमध्ये कुटुंबियांबरोबर साजरा केला. दियानं आपल्या वाढदिवसाला खास बनवण्यासाठी चुडा शिकार ओडीची निवड केली, जिथे तिचे संपूर्ण कुटुंब तिच्याबरोबर दिसले. आता तिनं तिचे सुंदर फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केले आहेत.

दिया मिर्झानं वाढदिवस केला साजरा: दिया मिर्झानं अरावलीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या या जुन्या दगडी आलिशान मालमत्तेत आपला सुंदर वेळ घालवला. यावेळी तिनं बोट आणि जीप सफारी केली. तसेच ती सुंदर सूर्यास्ताचा साक्षीदार देखील झाली. तिनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अरावलीच्या डोंगररांगांमध्ये घातवलेले तिचे सुंदर क्षण दिसत आहेत. उदयपूर रेल्वे स्थानकापासून सुमारे 24 किमी अंतरावर असलेले चुडा शिकार ओडी हे एक लक्झरी खाजगी रिझर्व्ह आहे. 150 हेक्टर घनदाट जंगल, सुंदर जंगल आणि तलावाच्या दृश्यांसह वन्यजीवांचा अनुभव याठिकाणी पर्यटकांना मिळतो. याशिवाय पर्यटकांना बिबट्या, रानडुक्कर, हरिण, राखाडी लंगूर आणि स्थानिक पक्ष्यांसह विविध प्राणी देखील पाहायला मिळते.

दिया मिर्झा (अभिनेत्री दिया मिर्झा कुटुंबासह (ईटीव्ही भारत))

दिया मिर्झानं शेअर केले सुंदर फोटो : ही मालमत्ता पारंपारिक राजस्थानी संगीत आणि आदरातिथ्य यासाठीही ओळखली जाते. यापूर्वी शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि बिपाशा बसू यांनी देखील आपल्या कुटुंबाबरोबर इथे सुट्टीचा आनंद घेतला आहे. उदयपूरमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार जात असतात. याशिवाय याठिकाणी पदेशातून देखील लोक येत असतात. दरम्यान दियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'आईसी 814: द कंधार हाईजॅक' या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर अभिनेता विजय वर्मा, अमृता पुरी, पत्रलेखा पंकज कपूर,आदित्य श्रीवास्तव, कुमुद मिश्रा, नसीरुद्दीन शाह हे स्टार्स महत्वाच्या भूमिकेत दिसले होते.

हेही वाचा :

  1. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिया मिर्झानं पती वैभव रेखीबरोबरचे फोटो केले शेअर
  2. Dhak Dhak trailer out: 'धक धक'चा कडक ट्रेलर रिलीज, महिलांचं जीवन बदलणारा प्रवास सुरू
  3. Dia Mirza Interview : दिया मिर्झा म्हणते वयाच्या ४० व्या वर्षी मी बुलेट चालवायला शिकले यावर अजूनही विश्वास बसत नाही, वाचा विशेष मुलाखत

ABOUT THE AUTHOR

...view details