मुंबई - Bobby Deol's sweet birthday post for wife: 'अॅनिमल' फेम बॉबी देओलचं नशीब पुन्हा एकदा चमकलं आहे. त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वप्नवत कमबॅक केलं. बॉबीने 'अॅनिमल' चित्रपटातील 15 मिनिटांच्या भूमिकेनं जगभरात प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत जरी रणबीर कपूर असला तरी बॉबीचं 'अॅनिमल'साठी अनेकांनी कौतुक केलं आहे. बॉबीचं या चित्रपटामधील 'जमाल कुडु' हे गाणं खूप लोकप्रिय झालं. त्यानं 'अॅनिमल'मध्ये साकारलेल्या अबरार हकला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. दरम्यान आज 24 जानेवारी रोजी बॉबी देओलची पत्नी तान्या आहुजा देओलचा वाढदिवस आहे. या विशेष प्रसंगी बॉबीनं तान्यासाठी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.
तान्या देओलचा वाढदिवस :बॉबीनं आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिलं, ''माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.'' बॉबी एक चांगला अभिनेता असण्याबरोबरच एक प्रेमळ पती देखील आहे, मात्र 'अॅनिमल'मध्ये त्याची भूमिका त्याच्या व्यक्तिमत्वाच्या पूर्णपणे विरुद्ध होती. बॉबी अनेकदा आपल्या पत्नीबरोबर सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यानं शेअर केलेल्या फोटोवर आता अनेकजण कमेंटस् करून तान्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या फोटोमध्ये बॉबी आपल्या पत्नीला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत.