मुंबई - Bipasha Basu :अभिनेत्री बिपाशा बसू आता लाइमलाइटपासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करत असते. दीड वर्षांपूर्वी बिपाशा आई झाली. तिचा आई होण्याचा प्रवास सोपा नव्हता. बिपाशा मुलगी देवी आणि पती करण सिंग ग्रोव्हरबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिनं सोमवारी मुलगी देवीच्या जन्म झाल्यानंतरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आई आणि मुलामधील प्रेमळ नाते दिसून येते. हा फोटो प्रसूतीनंतर घेतला गेला आहे. बिपाशा जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये पहिल्यांदा तिच्या मुलीला भेटली होती,तेव्हाचा हा क्षण तिच्यासाठी खूप खास होता.
बिपाशा बसूनं देवीबरोबरचा फोटो केला शेअर : फोटोमध्ये बिपाशा रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये एका बेडवर दिसत आहे आणि एक डॉक्टर मुलीसह तिच्या जवळ उभी आहे. फोटोत बिपाशा आणि मुलीचे डोळे बंद असल्याचं दिसत आहे. बिपाशानं ही पोस्ट शेअर करताना लिहिलं,"मदर्स डेच्या सन्मानार्थ पहिला फोटो तुमच्या मुलीबरोबरचा शेअर करा.' याशिवाय तिनं या पोस्टमध्ये पांढऱ्या रंगाचं हार्ट देखील जोडलं आहे. तसेच फोटो व्यतिरिक्त तिनं देवी आणि करणबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती देवीला फुल देत तिला हॅपी बर्थडे म्हणताना दिसत आहे. बिपाशानं शेअर केलेला व्हिडिओ खूप आकर्षक आहे.