मुंबई - Armaan malik:'बिग बॉस ओटीटी 3'मधील स्पर्धक सध्या खूप चर्चेत आहे. हा शो जसजसा ग्रँड फिनालेच्या जवळ येत आहे, तसतसे ट्रॉफीची शर्यतीमध्ये कोण विजयी होईल याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये काल रात्रीच्या भागात, एक पत्रकार परिषद झाली जिथे अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांना पायल मलिक ही त्याच्यापासून वेगळं होणार असल्याचं सांगण्यात आलं. हे ऐकताच दोघेही आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. यानंतर अरमानला पायल आणि कृतिकामधून कोणाला निवडशील हे जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यानं म्हटलं, "देवही उतरला तरी आमचं नातं बिघडणार नाही."
पायल अरमान मलिकपासून होणार विभक्त ? :बिग बॉसच्या घरातून एकदा बाहेर पडल्यावर तो आणि कृतिका पायलला समवणार असल्याचं त्यानं म्हटलं. यानंतर अरमानं सांगितलं, "हे नातं खरं आहे आणि त्यात कोणतीही फसवणूक नाही." आता सध्या अरमान, कृतिका आणि पायल मलिक यांच लग्न खूप चर्चेत आहे. अनेकजण या तिघांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करत आहेत. अरमानवर राष्ट्रीय टेलिव्हिजनवर बहुपत्नीत्वाचा प्रचार केल्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर याबद्दल उत्तर देताना अरमाननं म्हटलं होतं, "आपले जीवन हे एक खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे आणि माझ लग्न स्वीकारण्याचं धाडस मला आहे." अरमाननं पुढं म्हटलं की, त्याच्या दोन्ही पत्नी लग्नापासून खुश आहेत, त्यामुळे त्याला जगाची काही पर्वा नाही.