महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'च्या घराला मिळाला नवीन कॅप्टन, जाणून घ्या कोण? - Bigg Boss Marathi - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' हा शो आता अनेकांना आवडत आहे. आता या शोच्या नवीन कॅप्टनची घोषणा झाली आहे. चला तर मग पाहूयात या आठवड्यात कोण आहे बिग बॉस मराठीचा कॅप्टन.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2024, 1:12 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' हा सीझन प्रेक्षकांना खूप आवडत आहे. हा सीझन सुरू होऊन पाच आठवडे झालेत. दिवसेंदिवस घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. पहिल्या आठवड्यात घराची कॅप्टन अंकिता वालावलकर होती. यानंतर अरबाज पटेल हा कॅप्टन झाला. अरबाजला कॅप्टन्सी मिळाल्यानंतर दोन दिवसात गेम पलटला, यानंतर निक्की तांबोळी घराची कॅप्टन झाली. कॅप्टन्सी सोडून अरबाजनं तिला एकप्रकारे गिफ्ट दिलं होतं. आता बिग बॉसच्या घराला चौथा कॅप्टन मिळाला आहे. या आठवड्यात वर्षा उसगावकर घराच्या नवीन कॅप्टन बनल्या आहेत. त्यामुळे त्या आता नॉमिनेशन टास्कमध्ये सुरक्षित असेल.

वर्षा उसगावकर नवीन कॅप्टन : या आठवड्यातील कॅप्टन्सीसाठीचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये शेवटी जान्हवी, वर्षा, अंकिता, वैभव आणि सूरज हे पाच सदस्य होते. यामधून घराचा एक कॅप्टन होणार होता. मात्र अचानक असं काही घडलं की, या सदस्यांना आपापसात सहमती दर्शवून एक कॅप्टन निवडायला लावलं. यानंतर यात बहुमत न झाल्यामुळे बिग बॉसनं एक ट्विस्ट आणला. यात पाताळ लोक टास्क हरलेल्या टीम 'ए'ला म्हणजेच निक्की, अभिजीत, अरबाज, पंढरीनाथ आणि घन:श्याम यांना कॅप्टनची निवड करायची होती. या पाच जणांनी वर्षा उसगावकर यांची निवड केली. यानंतर वर्षा या बिग बॉसच्या घरामधील कॅप्टन झाल्या. यानंतर एक घोषणा ऐकायला मिळाली. 'हमारा नेता कैसा हो, वर्षाताई जैसा हो' असा आवाज हा घरात गुंजला.

वर्षा उसगावकर यांनी मानले आभार : यानंतर वर्षा यांनी घरातील सर्व सदस्याचे आभार मानले. आता वर्षा या बिग बॉसच्या घरातील कॅप्टन झाल्यानंतर, त्या काय बदलल करतील, हे पाहणं रंजक असणार आहे. याशिवाय बिग बॉस निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये रितेश देशमुख हा घरातील काही गोष्टी सांगताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये तो कोणी घरात चुका केल्या, कोण बरोबर होतं, याबद्दल सांगत आहे. आज रात्रीच्या एपिसोडमध्ये 'भाऊच्या धक्क्या'वर सगळ्यांचा हिशेब होणार असल्याचं रितेशनं सांगितलं आहे. आता या प्रोमोवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा :

  1. अभिजीत सावंत निक्की तांबोळीच्या बिग बॉसमधील गेममुळे नाराज, जोडीला जाणार तडा? - abhijeet sawant likely break jodi
  2. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये वाद झाल्यानंतर घरातील सदस्यांनी घेतली अरबाज आणि निक्कीची फिरकी - BIGG BOSS MARATHI
  3. अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळीच्या मैत्रीमुळे अरबाज पटेल नाराज, घरात केला राडा - Bigg Boss Marathi 5

ABOUT THE AUTHOR

...view details